Friday, September 20, 2024
Home मराठी ‘बाईपण भाई देवा’ फेम अभिनेत्री वंदना गुप्ते यांना अटक? प्रसिद्ध दिग्दर्शकाची पोस्ट व्हायरल

‘बाईपण भाई देवा’ फेम अभिनेत्री वंदना गुप्ते यांना अटक? प्रसिद्ध दिग्दर्शकाची पोस्ट व्हायरल

सध्या बॉक्स ऑफिसवर मराठी चित्रपटांची चांगली चलती आहे. मागील काही चित्रपटांनी आणि नुकताच प्रदर्शित झालेल्या ‘बाईपण भारी देवा’ या सिनेमाने बॉक्स ऑफिसवर बक्कळ कमाई केली आहे. या सिनेमाची सध्या सोशल मीडियासोबतच सगळीकडे तुफान चर्चा आहे. सिनेमाने कमाई तर केली सोबतच प्रेक्षकांची मने देखील जिंकली आहे. महिलांच्या रोजच्या जीवनातील समस्यांना सहज हात घालत मार्मिक पद्धतीने दिग्दर्शक केदार शिंदे यांनी हा चित्रपट साकारला आहे. चित्रपटाला महिलांसोबतच पुरुषांनी देखील चांगला प्रतिसाद दिला आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Kedar Shinde (@kedarshindems)

मात्र अशातच ‘बाईपण भारी देवा’ या सिनेमाचे दिग्दर्शक असलेल्या केदार शिंदे यांनी इंस्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली आहे. ज्यात त्यांनी एक फोटो शेअर केला असून, यात एक महिला कॉन्स्टेबल या सिनेमात शशी ही भूमिका साकारणाऱ्या वंदना गुप्ते यांच्याशी हस्तांदोलन करताना दिसत आहे. सोबतच पोलीस व्हॅन देखील आहे. हा फोटो शेअर करत केदार यांनी लिहिले, “‘बाईपण भारी देवा’ ह्या सिनेमाला फक्त महिलांची गर्दी का ? या मुद्द्यावर सिनेमातील शशीला अटक !! आता पुरुषांनी भरमसाठ गर्दी करून.. तीला सोडावावं.” तर त्यांनी कॅप्शनमध्ये लिहिले, “हे SOLID आहे.”

सध्या केदार यांनी ही पोस्ट कमालीची व्हायरल होत आहे. या पोस्टवर नेटकऱ्यांनी कमेंट्स करत पुरुषांनी तर आवर्जून बघावा असा हा सिनेमा असल्याचे सांगितले आहे. दरम्यान या सिनेमाने आतापर्यंत १२ कोटींपेक्षा अधिकच व्यवसाय केला असून, अजूनही सिनेमा चित्रपटगृहांमध्ये हाऊसफुल्ल चालू आहे.

‘बाईपण भारी देवा’ या सिनेमाने कमालीचे यश मिळवले तर आहे, सोबतच यात काम करणाऱ्या सर्वच महिला अभिनेत्रींचे देखील अमाप कौतुक होत आहे. रोहिणी हट्टंगडी, वंदना गुप्ते, सुचित्रा बांदेकर, शिल्पा नवलकर, सुकन्या मोने आणि दीपा परब या अभिनेत्री चित्रपटात मुख्य भूमिका साकारल्या आहेत.

अधिक वाचा-
श्वेता तिवारीच्या काळ्या साडीतील घायाळ करणाऱ्या अदा, फोटो पाहून चाहते फिदा
“नाव ‘बाईपण भारी देवा’ असलं तरी…”, अभिनेते संजय मोने यांची ‘ती’ पोस्ट चर्चेत

author avatar
Team Bombabomb

हे देखील वाचा