बॉलिवूड अभिनेत्री मलायका अरोरा तिच्या फिटनेससोबतच फॅशन सेन्ससाठीही ओळखली जाते. मलायकाचे आधीचे आणि आताचे फोटो पाहिले, तर तिच्यामध्ये खूप परिवर्तन पाहायला मिळतं. ४८ वर्षीय मलायका अरोराकडे पाहून, कोणीही तिच्या अचूक वयाचा अंदाज लावू शकत नाही. मलायका सिंगल मदर आहे. अरबाज खानसोबत तिचं १९ वर्षांचं लग्न २०१८ मध्ये तुटलं. अरबाजपासून विभक्त झाल्यानंतर, मलायकाला अर्जुन कपूरमध्ये नवीन प्रेम मिळालं. दोघेही एकमेकांना खूप पसंत करतात. आज (२३ ऑक्टोबर) अभिनेत्री आपला ४८ वा वाढदिवस साजरा करत आहे. या निमित्त तिच्या आयुष्यावर एक नजर टाकूया.
ट्रेंड डान्सर आहे मलायका
मलायका एक प्रशिक्षित डान्सर आहे. तिने वयाच्या चौथ्या वर्षापासून डान्स शिकण्यास सुरुवात केली होती. सुरुवातीच्या काळात तिने ‘गुड नाल इश्क मीठा’ आणि ‘छैय्या छैय्या’ या दोन गाण्यांवर डान्स करून आपली छाप पाडली.
मलायकाचा जन्म २३ ऑक्टोबर १९७३ रोजी झाला होता. ती अगदी लहान वयातच मॉडेलिंगमध्ये सामील झाली. १९९० च्या अखेरीस तिची व्हिडिओ जॉकी म्हणून निवड झाली. अभिनेत्री नेहमीच तिच्या डान्समुळे चर्चेत असते. मलायकाने अनेक चित्रपटांमध्ये आयटम नंबर केले आहेत.
फॅशनच्या बाबतीत तर मलायकाची बातच काही और आहे. ती तिच्या फॅशनेबल स्टाईलने प्रत्येकाला घायाळ करत असते. फिटनेससाठी जिममध्ये जाणे असो किंवा आऊटिंग असो, दरवेळी मलायका तिच्या फॅशन सेन्सने सर्वांना प्रभावित करते. मलायका अरोरा ही बॉलिवूड इंडस्ट्रीतील सर्वात श्रीमंत अभिनेत्रींपैकी एक आहे आणि तिच्याकडे खूप महागड्या गाड्यांचा संग्रह देखील आहे.
मलायकाचा नेटवर्थ
माहितीनुसार, मलायका अरोराची वार्षिक कमाई १०० कोटींच्या जवळपास आहे. चित्रपटांमध्ये आयटम नंबर करण्यासाठी ती सुमारे १.७५ कोटी रुपये घेते. या व्यतिरिक्त, तिला रियॅलिटी शो आणि जाहिरात शूटसाठी मोठी रक्कम दिली जाते. मलायकाचा मुंबईत स्वतःचा आलिशान फ्लॅट आहे जिथे ती तिच्या मुलासोबत राहते.
कसं तुटलं लग्न?
साल १९९३ च्या कॉफी जाहिरातीच्या शूटिंग दरम्यान अरबाज आणि मलायका पहिली भेट झाली होती. ही जाहिरात खूपच बोल्ड होती, त्यावरून वादही झाला होता. या शूट दरम्यान, दोघेही एकमेकांच्या प्रेमात पडले आणि ५ वर्षे डेटिंग केल्यानंतर १२ डिसेंबर १९९८ रोजी दोघांनी ख्रिश्चन आणि मुस्लिम रीतिरिवाजानुसार लग्न केले. लग्नाच्या १९ वर्षानंतर २०१७ मध्ये या जोडप्याने घटस्फोट घेतला.
दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…
हेही नक्की वाचा-
-काय सांगता! मलायका अरोराला मिळाला नवीन जोडीदार? चाहत्यांना झाली अर्जुन कपूरची आठवण
-जणू भासे स्वर्गातील अप्सराच! ऑफ शोल्डर गाऊनमध्ये रॅम्प वॉक करत मलायकाने केले चाहत्यांना घायाळ