Friday, April 26, 2024

मलायकाने घराच्या छतावर ‘या’ व्यक्तीसोबत लावले जोरदार ठुमके; डान्स मुव्हज पाहून तुम्हीही म्हणाल, ‘लाजवाब’

हिंदी चित्रपटसृष्टीतील काही अभिनेत्री अशा आहेत, ज्या सध्या अभिनयापासून दूर आहेत. मात्र, त्या सोशल मीडियावर चांगल्याच सक्रिय आहेत. त्या सोशल मीडियावर नेहमीच आपले फोटो आणि व्हिडिओ शेअर करत चाहत्यांच्या संपर्कात राहण्याचा प्रयत्न करत आहेत. या अभिनेत्रींमध्ये ‘मुन्नी’ म्हणजेच मलायका अरोराचेही नाव आवर्जुन घ्यावे लागेल. मलायका आपल्या अभिनयासोबतच डान्ससाठीही ओळखली जाते. मलायकाचा नुकताच एक व्हिडिओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. या व्हिडिओत ती आपले शानदार मूव्हज दाखवताना दिसत आहे. घराच्या छतावरील या डान्स व्हिडिओत मलायका एकटीच नाहीये, तर तिच्यासोबत आणखी एक व्यक्तीही जबरदस्त मुव्हज दाखवताना दिसत आहे. तो व्यक्ती कोण आहे, हेदेखील तिने स्पष्ट केले आहे.

मलायकाने हा व्हिडिओ शेअर करत योग आणि डान्सला प्रमोट केले आहे. तिने लिहिले आहे की, “माझा असा विश्वास आहे की,आपल्यातील कोणी श्वास घेण्याच्या बाबतीत योगी आणि आणि आपल्याला निश्चितच मनापासून डान्सर झाले पाहिजे.” या कॅप्शनमध्ये मलायकाने ती कोणासोबत डान्स करत आहे, हे सांगितले आहे. (Actress Malaika Arora Dancing On The Roof Top With Unknown Person Video Went Viral)

मलायकाच्या या व्हिडिओला आतापर्यंत ३ लाखांपेक्षाही अधिक लाईक्स मिळाले आहेत. तसेच या व्हिडिओला आतापर्यंत ३३ लाखांपेक्षाही अधिक व्ह्यूज मिळाले आहेत.

मलायकाने या पोस्टमध्ये सर्वेश शशि यांना टॅग केले आहे. तसेच तिने त्यांना आपला पार्टनर आणि भाऊ सांगितले आहे. हे तेच व्यक्ती आहेत, ज्यांच्यासोबत मलायका योगासन प्रमोट करत आहे. सर्वेश यांना रकुल प्रीत सिंग, तमन्ना भाटिया, ईशा कोप्पिकर, श्रुती हासन, श्रिया सरन, अर्जुन कपूर यांसारखे अनेक दिग्गज कलाकार सोशल मीडियावर फॉलो करतात. सर्वेश भारतातील मिलेनिअर योगी आहेत. त्यांना जेनिफर लोपेझ, मलायका अरोरा यांसारख्या कलाकारांसोबत आपल्या ब्रँडला जगभरात पोहोचवायचे आहे.

सर्वेश हे केवळ ६ वर्षांचे होते, जेव्हा त्यांच्या आई- वडिलांनी त्यांना योगसाठी प्रेरित केले होते. त्यानंतर वयाच्या १७ व्या वर्षापर्यंत त्यांनी योगामध्ये आपले करिअर बनवले. आज ते योग गुरू म्हणून खूप प्रसिद्ध झाले आहेत. तसेच ते जगभरातील मोठमोठ्या कलाकारांच्या संपर्कात असतात.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-कार्तिक आर्यन नेटफ्लिक्सवर करणार जबरदस्त ‘धमाका’, ट्रेलर पाहून तुमच्याही अंगावर येतील शहारे

-अर्रर्रर्र! जेव्हा नाचता नाचता स्टेजवर धाडकन पडली सपना चौधरी, बघण्यासारखी होती प्रेक्षकांची रिऍक्शन

-‘बीच बॉम्ब’ मीरा राजपूतने शेअर केला तिचा ग्लॅमरस, मादक बिकिनी फोटो

हे देखील वाचा