लग्नाबद्दल होणाऱ्या ट्रोलिंगवर मराठमोळ्या नेहा पेंडसेची प्रतिक्रिया, म्हणाली ‘माझ्या पतीला त्रास…’

on making fun of the wedding nehha pendse said now i have learned to ignore trolling


मराठमोळी अभिनेत्री नेहा पेंडसेने यावर्षी जानेवारीत शार्दुल बियासशी लग्न केले होते. शार्दुलचा दोनदा घटस्फोट झाला आहे, दोन्ही विवाहातून त्याला एक- एक मूलही आहे. महत्त्वाचे म्हणजे, खूप दिवसांपासून नेहा पेंडसेला तिच्या लग्नावरून ट्रोल केले जात आहे. एका मुलाखतीदरम्यान नेहाने ट्रोल होण्याबद्दल वक्तव्य केले आहे.

ट्रोलिंगकडे दुर्लक्ष करण्यास शिकली आहे
नुकत्याच टाईम्स ऑफ इंडियाला दिलेल्या मुलाखतीदरम्यान अभिनेत्रीने सांगितले, की तिच्या लग्नाची चेष्टा करणे अजूनही थांबले नाहीत. ती म्हणाली, “मला वाटते ट्रोलिंग कधीच थांबू शकत नाही. लोक तुम्हाला ट्रोल करण्यासाठी कारणे शोधत असतात. परंतु माझे पती आणि मी त्याकडे दुर्लक्ष करायला शिकलो आहोत. सुरुवातीला ट्रोलिंगने माझ्या पतीला त्रास होत होता. कारण त्यांना या सर्व गोष्टींची सवय नव्हती. परंतु आता तेही दुर्लक्ष करायला शिकले आहेत. आता ट्रोलिंगचा आमच्यावर परिणाम होत नाही.”

लोकांनी माझा फायदा उचलण्याचा प्रयत्न केला
स्त्री असल्यामुळे इंडस्ट्रीत कशाप्रकारे तिला विविध आव्हानांना तोंड द्यावे लागले, याबद्दलही तिने सांगितले. ती म्हणाली, ”एक महिला म्हणून जर तुम्ही अशक्त असाल, तर कोणत्याही कामाच्या ठिकाणी लोक तुमचा गैरफायदा घेण्याचा प्रयत्न करतात. लोकांनी माझा फायदा उठवण्याचाही प्रयत्न केला आहे. तथापि, मला वाटते की या सर्व घटना आपल्याला अधिक बळकट बनवतात.”

नेहा पेंडसे या दिवसांत अतिशय लोकप्रिय टीव्ही शो ‘भाभीजी घर पर हैं’मध्ये एका नवीन लूकमध्ये दिसत आहे. या शोमध्ये तिने सौम्या टंडनची जागा घेतली आहे. तसेच, “भाभीजी घर पर हैं’ मध्ये नेहा पेंडसेला देखील अनिता भाभीच्या रुपात खूप पसंत केले जात आहे.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-‘विकी कौशलने मला असे करण्यास भाग पाडलेे’, म्हणत समंथाने जबरदस्त व्हिडिओ केला शेअर

-बोल्ड अभिनेत्री निया शर्मा घालतेय मैत्रिणीसोबत राडा!! भर रस्त्यावर शूट केलेल्या व्हिडिओला मिळतोय तुफान प्रतिसाद

-बॉलिवूडच्या गाण्यांची देशाबाहेरही जादू कायम! हिंदी गाण्यावरील हॉलिवूड मॉडेलचा डान्स व्हायरल


Leave A Reply

Your email address will not be published.