बॉलिवूडमधील ‘गाणकोकिळा’ कोण असं म्हटलं की, सर्वांच्या ओठांवर लता मंगेशकर हेच नाव येतं. लता मंगेशकर यांची गाणी आजही ऐकली, तरीही आपण एका क्षणासाठी थक्क होऊन जातो. आपल्या लयबध्द सुरांनी लता मंगेशकरांनी लाखो चाहत्यांची मने जिंकली आहेत. परंतु तुम्हाला माहिती आहे का? लता मंगेशकर गाण्या बरोबरच अभिनय देखील करत होत्या.
वयाच्या १४व्या वर्षी घेतली अभिनयात उडी
लता मगेशकरांना आपल्या गाण्या बरोबरच अभिनयाचीही आवड निर्माण झाली होती. त्यानंतर वयाच्या १४ व्या वर्षी लता मगेशकरांनी आपल्या अभिनयाला सुरुवात केली होती. त्यांना चित्रपटांमध्ये एखाद्या अभिनेत्रीची अथवा अभिनेत्रीच्या बहिणीची भूमिका मिळायची. अभिनयाच्या कारकिर्दीत त्यांनी सहकलाकाराच्या भूमिका पार पडल्या. परंतु लता मंगेशकर अभिनयात फार काळ टिकल्या नाहीत. (Once Legend Actor And Director Show Man Raj Kapoor Called Singer Lata Mangeshkar An Ugly Girl)
चित्रपटात मुख्य भूमिका साकारण्याची मिळाली संधी
साल १९७८ मध्ये लता मगेशकरांना चित्रपटात काम करण्याची संधी मिळाली. राज कपूर दिगदर्शित ‘सत्यम शिवम सुंदरम’ या चित्रपटात लता मगेशकरांना मुख्य भूमिका मिळाली होती. या चित्रपटातून राज कपूर यांना दाखवायचे होते की, विश्वास हा प्रेम व निस्वार्थ मनावर अवलंबून असतो, बाह्य शारीरिक रुपावर नाही. त्यासाठी त्यांना सुंदर आवाज असलेली, परंतु दिसायला सामान्य असलेली मुलगी हवी होती. त्या पात्रासाठी लता मंगेशकर यांची निवड करण्यात आली होती.
राज कपूर यांच्यावर चिडल्या लता मंगेशकर
‘सत्यम शिवम सुंदरम’ या चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान राज कपूर यांची एक मुलाखत घेण्यात आली होती. मुलाखतीमध्ये ते म्हटले होते की, “तुम्ही एखादा दगड घ्या. त्या दगडावर एखादा धार्मिक रंग लावला की, त्या दगडाचे महत्त्व वाढते. तसंच मी एक सुंदर आवाज ऐकला, परंतु नंतर समजले ती मुलगी दिसायला कुरूप आहे.” फक्त एवढं बोलून राज कपूर थांबतात आणि कुरूप मुलीचं वाक्य कट करायला सांगतात. लता मंगेशकरांना हे समजले, तर त्यांना राग येईल म्हणून हे वाक्य कट करायला सांगतात. परंतु चित्रपटाच्या सुरुवातीला प्रचारादरम्यान या गोष्टी काही माध्यमांमधून समोर आल्या. लता मंगेशकर यांच्याकडे सुंदर आवाज व विरोधाभास असलेला चेहरा देखील आहे. म्हणूनच त्यांना या चित्रपटात घेण्यात आले. हे समजल्यानंतर लता मंगेशकर खूप चिडल्या व चित्रपटात काम करण्यास नकार दिला.
यानंतर राज कपूर यांनी लता मंगेशकरांची खूप समजूत घातली. चित्रपटात काम करण्याची विनंती केली, परंतु लता मंगेशकरांनी त्यांचे काहीच ऐकले नाही. त्यानंतर निदान चित्रपटात गाणी तरी गा असं राज कपूर म्हणत होते. त्यानंतर देखील सुरुवातीला त्यांनी नकारच दिला, पण राज कपूर यांनी खूप विनंती केल्यानंतर लता मंगेशकर ‘सत्यम शिवम सुंदरम’ चित्रपटात आपला आवाज देण्यासाठी तयार झाल्या होत्या.
दैनिक बोंबाबोंचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…
हेही नक्की वाचा-
-जेव्हा महेश भट्ट यांना समजवण्यासाठी नग्नावस्थेत रस्त्यावर धावल्या होत्या परवीन बाबी, मग पुढे…
-सिनेमागृह सुरू करण्यास शासनाचा हिरवा कंदील, तरीही ‘लाल सिंग चड्ढा’ प्रदर्शनाची तारीख लांबणीवरच