Wednesday, July 3, 2024

अर्रर्र! रकुल प्रीत सिंग झाली ऊप्स मोमेंटची शिकार, संतापलेल्या युजर्सनी दिलं ज्ञान

बॉलिवूड अभिनेत्री रकुल प्रीत सिंगने (Rakul Preet Singh) हिंदी चित्रपटांसोबतच तेलुगू आणि पंजाबी चित्रपटांमध्येही आपले अभिनय कौशल्य दाखवले आहे. रकुलने तिच्या करिअरमध्ये अनेक हिट चित्रपट दिले आहेत. अभिनयासोबतच रकुल तिच्या परफेक्ट स्टाईलसाठीही ओळखली जाते. एवढेच नाही, तर चाहते रकुलच्या स्टाईलला कॉफी करताना दिसत आहेत, पण नुकतीच रकुल कॅमेऱ्यासमोर ऊप्स मोमेंटची शिकार झाली आहे. फॅशनिस्टा रकुलची ही ऊप्स मोमेंट पाहून सोशल मीडियावर चाहते तिची जोरदार शाळा घेताना दिसत आहेत.

शॉर्ट स्कर्ट घालून बसल्यामुळे रकुल सापडली अडचणीत
रकुलची स्टाईल अप्रतिम आहे. चाहत्यांची मने जिंकणाऱ्या लूकने तिने अनेकवेळा इंटरनेटवर खळबळ उडवून दिली आहे, परंतु काहीवेळा गोष्टी आपल्याला पाहिजे त्याप्रमाणे नसतात. वॉर्डरोब मालफंक्शनमुळे या अभिनेत्रीला अनेकवेळा ऊप्स मोमेंटचा सामना करावा लागला आहे. प्रत्येक स्टार यापूर्वी अशा परिस्थितीतून गेला आहे. असाच काहीसा प्रकार रकुलसोबत घडला, जेव्हा ती शॉर्ट स्कर्ट परिधान करून एका कार्यक्रमात पोहोचली.

‘या’ चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये झाली ऊप्स मोमेंटची शिकार
‘दे दे प्यार दे’ चित्रपटाच्या प्रमोशनदरम्यान रकुल गुलाबी रंगाच्या शॉर्ट स्कर्टमध्ये दिसली होती. स्कर्ट खूप छोटा होता आणि ती खूप उंच दिसत होती. कार्यक्रमातील फोटोंमुळे नेटकरी संतापले. यानंतर नेटकऱ्यांनी तिला खूप ट्रोल केले आणि अभिनेत्रीला व्यवस्थित बसण्याचा सल्ला दिला.

आता दोन वर्षांनंतर हे फोटो पुन्हा सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहेत. एका परदेशी गायिकेच्या ऊप्स मोमेंटनंतर रकुल प्रीत सिंगचे हे फोटो सोशल मीडियावर सतत दिसत आहेत. यापूर्वीही रकुल प्रीत सिंग ऊप्स मोमेंटची शिकार झाली आहे. यादरम्यानचे तिचे फोटो एका सोशल मीडिया पेजवर शेअर केले होते.

हा रकुलच्या फोटोंचा कोलाज होता, ज्यामध्ये अभिनेत्रीचा ड्रेस तिची फसवणूक करताना दिसत आहे. फोटोंमध्ये रकुल पिवळ्या रंगाच्या फ्रॉक आणि डेनिम जॅकेटमध्ये दिसत होती. या ड्रेससोबत तिने पांढरे शूज घातले होते. फोटोमध्ये रकुलने फोटोग्राफरला पोझ देताच, जोरदार वाऱ्यामुळे तिचा ड्रेस हवेत उडला. यादरम्यान रकुल थोडी अस्वस्थ झाली आणि तिचा ड्रेस तिच्या हाताने हाताळताना दिसली, पण तोपर्यंत तिची ऊप्स मोमेंट कॅमेऱ्यात कैद झाली होती.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-‘बिग बॉस १५’च्या घरात ‘या’ स्पर्धकावर भडकला सलमान खान; म्हणाला, ‘मी आत येतो, मला आपटून…’

-Bigg Boss 15: प्रतीक सहजपालवर भडकली तेजस्वी प्रकाश; म्हणाली, ‘सांगू का, टास्कमध्ये तुझे हात कुठे कुठे लागतात?’

-गेल्या दोन वर्षांपासून ‘या’ आजाराशी झुंज देतेय राणी चॅटर्जी, पोस्ट शेअर करत मांडली व्यथा

हे देखील वाचा