अनिल कपूर आणि अनुराग कश्यप यांचा AK vs AK हा सिनेमा नुकताच नेटफ्लिक्सवर प्रदर्शित झाला. हा चित्रपट प्रदर्शित होताच लोकांनी त्याला जोरदार प्रतिसाद दिला आहे. चित्रपटाच्या विषयाचे सर्वांकडून जोरदार कौतुक होत आहे. नुसते भारतीय प्रेक्षक नाही तर भारताबाहेरील प्रेक्षक देखील या सिनेमाचे खूप कौतुक करत आहे. यात स्लमडॉग मिलिनियर सारख्या ऑस्कर अवॉर्ड जिंकणाऱ्या चित्रपटाच्या दिग्दर्शकांचाही समावेश आहे.
डॅनी बॉयल यांनी व्हिडिओ कॉलवर अनिल कपूर, अनुराग कश्यप आणि दिग्दर्शक विक्रमादित्य मोटवानी यांच्याशी संवाद साधला. त्यावेळी त्यांनी या सिनेमाची खूप स्तुती केली. त्यांच्या या कॉलचा व्हिडिओ अनिल कपूर यांनी त्यांच्या ट्विटर अकाऊंट शेयर केला आहे.
Very grateful to the incredible Danny for being so generous with his valuable time and for showing his support for the film. We are thrilled that you liked the film enough to watch it (twice!) and to moderate such an insightful panel on the BFI platform. pic.twitter.com/NyDk3Mcvlx
— Anil Kapoor (@AnilKapoor) December 29, 2020
यात डॅनी यांनी सांगितले की, मला तुमच्यापर्यंत हे पोचवायचे होते की तुम्ही किती सुंदर आणि उत्कृष्ट चित्रपट बनवला आहे. हा चित्रपट पाहून मी अचंबित झालो आहे. माझ्यासाठी हा सिनेमा म्हणजे चित्रपट तयार करण्याचे एक विद्यापीठ बनले आहे. सर्वच बाबींमध्ये हा सिनेमा सरस ठरत आहे. मला आवडणाऱ्या काही चित्रपटांपेक्षा देखील या सिनेमाचे दिग्दर्शन आणि कथा सुंदर आहे.
या चित्रपटाची कथा काल्पनिक आहे मात्र चित्रपटाचे संयोजन खरे ठेवण्यात आले आहे. या सिनेमात अनिल कपूर एक अभिनेताच दाखवले गेले आहे तर अनुराग कश्यप एक दिग्दर्शक. या सिनेमाची शूटिंग मुंबईतच फिल्मिस्तान स्टुडिओ, रस्त्यांवर, अनिल कपूरच्या घरी झाली आहे. या चित्रपटात सोनम कपूर, हर्षवर्धन कपूर आणि बोनी कपूर यांनी पाहुण्या कलाकाराची भूमिका साकारली आहेत. अनिल कपूर यांच्या वाढदिवसाला देखील एका ट्विस्टच्या रूपात या चित्रपटात वापरण्यात आले आहे.
या चित्रपटाचे प्रमोशन खूप वास्तविक ठेवण्यात आले होते. या प्रमोशन दरम्यान अनिल कपूर आणि अनुराग कश्यप यांनी बघणार्याला खरे वाटेल असे भांडण ट्विटरवर केले होते. त्याच्यात ट्विटरवॉर बघून अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला होता. पण नंतर त्यांची हे भांडण प्रमोशनचा एक भाग असल्याचे सांगितले होते.