कोरोनामुळे संपूर्ण जग मागच्या दोन वर्षांपासून वेठीस धरल्या गेले आहे. कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे सर्वांच्या सार्वजनिक आयुष्यावर निर्बंध आले आणि आमपासून खासपर्यंत सर्वच लोकं घरात कैद झाले. कोरोनामुळे अनेक वर्षांची परंपरा असलेले कार्यक्रम रद्द झाले. फक्त बॉलिवूडचं नाही तर जगातील सर्वच चित्रपटसृष्टींवर तर कोरोनाचा मोठा प्रभाव पडला. संपूर्ण जगातील मनोरंजनविश्वाची पंढरी समजला जाणारा ऑस्कर पुरस्कारांचा सोहळा देखील याला अपवाद नव्हता. मात्र आता पुन्हा ऑस्कर (Oscar) पुरस्कारांचा सोहळा मोठ्या दिमाखात साजरा केला जाणार आहे.
मागच्या तीन वर्षांपासून हा पुरस्कार सोहळा सेलिब्रिटीज होस्ट करत होते. मात्र यावर्षी हा सोहळा सूत्रसंचालित करण्यासाठी खास व्यक्तीला निवडण्यात आले आहे. २०१८ नंतर या ऑस्कर सोहळ्याचा एक पण होस्ट भाग नव्हता. मात्र आता मिळत असलेल्या माहितीनुसार वॉल्ट डिज्नी कंपनी (DIS.N) २७ मार्च रोजी लॉस एंजिलिसमध्ये ऑस्कर पुरस्कारांचे आयोजन करणार आहे.
प्राप्त माहितीनुसार यावर्षी ऑस्कर सोहळ्यामध्ये होस्ट दिसणार आहे. याची अजून अधिक माहिती मिळालाय नसली तरी एबीसी एंटरटेनमेंट प्रेसिडेंट क्रेग एरविच यांनी एका कार्यक्रमात सांगितले की, ते देखील या सोहळ्याचे सूत्रसंचालन करू शकतात.ऑस्कर पुरस्कारांना मागच्या तीन वर्षांपासून सेलिब्रिटी प्रेजेंटेर्स होस्ट करत होते. ब्रिटिश अभिनेते टॉम हॉलंड यांच्या एका फॅनने सांगितले होते की, त्याला यावर्षीचा ऑस्कर त्याच्या सहायक अभिनेत्रीसोबत जेंडयासोबत होस्ट करायचे कारण त्यांच्या ‘स्पायडरमॅन: नो वे होम’ सिनेमाला मोठे यश मिळाले. हॉलंड यांनी मागच्यावर्षी सांगितले होते की, त्यांना हा पुरस्कार सोहळा होस्ट करायला खूप आवडेल.
याआधी २०१७ आणि २०१८ साली अनुक्रमे जिमी किमेल कॉमेडियन क्रिस रॉक आणि एलेन डीजेनरस यांनी या शोचे सूत्रसंचालन केले होते. एबीसीने सांगितले की, २०२२ मध्ये ऑस्कर पुन्हा हॉलिवूडच्या डॉल्बी थिएटरमध्ये दिसणार आहे. मागच्यावर्षी कोरोनापासून वाचण्यासाठी नामांकित लोकांना आणि पाहुण्यांना एका छोट्याशा समारंभात लॉस ऍंजिलिसच्या ऐतिहासिक युनियन स्टेशनमध्ये झाला होता. यावर्षीचे ऑस्कर पुरस्कारांचे नामांकन फेब्रुवारीमध्ये जाहीर केले जाणार आहे.
हेही वाचा :