ऑस्कर 2023 भारतासाठी खूप खास ठरला आहे. यावेळी दोन पुरस्कार भारताला मिळाले आहे. त्यापैकी एक म्हणजे आराआरआर मधील ‘नाटू-नाटू‘ या गाण्याला, तर दुसरा पुरस्कार गुनीत मोंगा दिग्दर्शित ‘द एलिफंट व्हिस्पर्स‘ या डॉक्यूमेंट्री फिल्मला मिळाला आहे. गुनीत मोंगा यांना मंचावर ऑस्कर पुरस्काराने सन्मानित करण्यात आले, ज्यामुळे त्या सध्या खूप चर्चेत आहेत. अशातच एक व्हिडिओ समाेर आला आहे, ज्यामध्ये गुनीत मोंगा यांना मंचावर भाषण करण्याची परवानगी नव्हती, तर इतर लोकांना बोलण्याची परवानगी देण्यात आली होती.
ऑस्कर पुरस्कार 12 मार्च 2023 रोजी लॉस एंजेलिस, यूएसए मधील डॉल्बी थिएटरमध्ये झाला. यावेळी गुनीत मोंगा यांच्या ‘द एलिफंट व्हिस्पर’ या डाॅक्यूमेंट्री फिल्मला सर्वोत्कृष्ट बेस्ट डॉक्यूमेंट्री शॉर्ट फिल्म पुरस्कार मिळाला. त्यावेळी कार्तिकी गोन्साल्विसला बोलण्याची परवानगी दिली होती. तर, गुनीत मोंगा यांचे भाषण अर्ध्यातून कापले गेले. याबाबत खुद्द गुनीत मोंगा यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
गुनीत मोंगा म्हणाल्या, “माझे बोलणे अर्ध्यातून कापल्याने मी खूप निराश आहे, माझ्यासाठी हा धक्का होता. मला एवढंच सांगायचं होतं की, भारतीय निर्मितीतला हा भारताचा पहिला ऑस्कर पुरस्कार आहे, जी स्वतःच एक मोठी गोष्ट आहे. मला खूप आनंद झाला, बोलायचे होते, पण बोलू दिले नाही. अशात पाश्चात्य मीडिया मला बोलण्याची संधी न दिल्याने ताने मारत आहे.”
View this post on Instagram
गुनीत मोंगा पुढे म्हणाल्या, “यामुळे लोक दुखावले आहेत. मला बोलण्याची संधी मिळाली नाही, असे व्हिडिओ आणि ट्विटही सोशल मीडियावर टाकण्यात आले आहेत. भारतासाठी हा खास क्षण होता, जो माझ्यापासून हिरावून घेतला गेला. पण मग, मी विचार केला की, काहीही झाले तरी मी येथे परत येईन आणि माझे म्हणणे ऐकले जाईल. मला माझे विचार मांडण्याच्या अनेक संधी मिळाल्या आहेत आणि सर्वांचे प्रेम मिळाल्याने मला खूप आनंद होत आहे.” असे गुनीत माेंगा म्हणाल्या.(oscars 2023 producer guneet monga was discriminated on the stage her speech cut off)
दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
स्वराच्या लग्नात दिग्गज नेते मंडळींचा समावेश; पण युजर्सकडून राज्यसभा महिला खासदार ट्राेल
सोशल मीडियावरील ‘तो’ व्हिडिओ पाहून पवित्रा पुनिया आणि एजाज खान यांच्या लग्नाच्या चर्चांना उधाण