Sunday, May 3, 2026
Home बॉलीवूड ‘आरआरआर चित्रपटावेळी राजामौली यांना अस्थमाचा अटॅक आला, तरीही…’, श्रिया सरनने सांगितला ‘तो’ धक्कादायक किस्सा

‘आरआरआर चित्रपटावेळी राजामौली यांना अस्थमाचा अटॅक आला, तरीही…’, श्रिया सरनने सांगितला ‘तो’ धक्कादायक किस्सा

प्रसद्ध चित्रपट निर्माता एसएस राजामौली आपल्या चित्रपटांमुळे सतत चर्चेत असतात. ‘बाहुबली: द कन्क्लूजन‘, ‘आरआरआर‘ सारखे धमाकेदार चित्रपट तयार करुन त्यांनी इंडस्ट्रीमध्ये वेगळेच स्थान निर्माण केले आहे. त्यांनी आराआरआर चित्रपाटसाठी जिवतोड मेहनत घेतली असून अभिनेता ऑस्कर नॉमिनेशनसाठी धडपड करत आहे. याबद्दल अभिनेत्री श्रिया सरन हिने अनेक खुलासे केले आहे.

आरआरआर स्टारर एसएस राजामौली (Filmmaker SS Rajamouli) सतत आपल्या ब्लॉकबस्टर चित्रपटांमुळे ओळखले जातात. त्यांच्या तब्येतविषयी नुकतंच अभिनेत्री श्रिया सरन (Shriya Saran) हिने मोठा खुलासा केला आहे. तिने सांगितले की, आरआरआर चित्रपटाच्या शुटिंगवेळी राजामौली यांची तब्येत फारच बिघडली होती. त्यांना अस्थामाचा झटका देखिल आला होता मात्र, तरीही त्यांनी शुटिंग पूर्ण केली होती.

नुकतंच अभिनेत्री श्रियाने सरन हिने एका मुलाखतीम्यान सांगितले की, “राजामौली यांनी ‘आरआरआर’ चित्रपटावर खूपच कष्ट घेतले आहेत. आम्ही ज्या सिनची शुटिंग करत होतो त्या सिनपूर्वी च्यांना अस्थमाचा अटॅक देखिल आला होता मात्र, याचा त्यांना काहीच फरक नही पडला नाही.” अभिनेत्रीने चित्रपटाबद्दल बोलत असताना सांगितले की, “अद्भुत.. राजामौली यांनी ज्या प्रकारे ते लिहिलं आहे, ज्या प्रकारे त्यांनी दिग्दर्शित केलं आहे, त्यांच्याकडे नेहमीच जीवनाचा दृष्टीकोन मोठा असतो, जो आश्चर्यकारक आहे!”

श्रिया सरन दुसऱ्यांदा राजामौलीसोबत एकत्र काम करत आहे. यापूर्वी तिने अभिनेता प्रभास (Prabhas) सोबत ‘छत्रपती’ (2005) मध्ये काम केले होते. या चित्रपटानंतर ‘बाहुबली: द कन्क्लूजन’ या चित्रपटातही काम करणार आहे अशा अफवा देखिल उठल्या होत्या मात्र, या फक्त अफवाच बनून राहिल्या. सध्या श्रिया तिचा नविन चित्रपट ‘दृष्यम2‘ च्या यशाचा आनंद लुटत आहे.

दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
अधिक वाचा-
‘कंगन’ खेळण्याच्या कार्यक्रमामध्ये जिंकली देवोलिना, तर लाजून पती शाहनवाजने लपवले तोंड

धक्कादायक! हॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेता आणि डान्सरची आत्महत्या…

हे देखील वाचा