Friday, April 18, 2025
Home अन्य ‘बिग बॉस ओटीटी’वरील सौंदर्यवतींना पछाडत मिलिंद गाबा सर्वात पुढे; जाणून घ्या ‘या’ स्पर्धकांचे इंस्टाग्रामवरील फॉलोवर्स

‘बिग बॉस ओटीटी’वरील सौंदर्यवतींना पछाडत मिलिंद गाबा सर्वात पुढे; जाणून घ्या ‘या’ स्पर्धकांचे इंस्टाग्रामवरील फॉलोवर्स

नुकतेच बिग बॉसच्या ओटीटी पर्वाचा दणक्यात शुभारंभ झाला. या शोच्या निमित्ताने करण जोहरने ओटीटी प्लॅटफॉर्मवर पदार्पण केले. करण पहिल्यांदाच या शोमध्ये सूत्रसंचालकाच्या भूमिकेत दिसणार आहे. बिग बॉसबद्दल प्रेक्षकांच्या मनात खूपच उत्सुकता असते. स्पर्धक, नवीन फॉरमॅट, नवीन वाद, नवीन किस्से आदी अनेक मसालेदार गोष्टी या शोमधून लोकांना पाहायला मिळतात. या शोमध्ये येणारा प्रत्येक स्पर्धक जरी मेकर्सच्या निर्णयामुळे आला असला, तरी त्या स्पर्धकाला शोमध्ये टिकवणे हे केवळ प्रेक्षकांच्या हातात असते.

आजच्या काळात बिग बॉसमध्ये टिकण्यासाठी लोकप्रियता आणि सोशल मीडियावरील फॉलोवर्स खूपच महत्वाचे ठरत आहेत. सोशल मीडियावर जितके जास्त फॉलोवर्स, तितके जास्त वोट त्या स्पर्धकाला मिळणार हे तर नक्कीच असते. त्यामुळे आज आपण या लेखातून आता सुरू झालेल्या बिग बॉसमध्ये स्पर्धक म्हणून गेलेल्या १३ स्पर्धकांच्या फॉलोवर्सबद्दल जाणून घेणार आहोत. (ott big boss contestant social media folowers)

मिलिंद गाबा-
मिलिंद हा पंजाबी गायक असून तो सध्या बिग बॉस ओटीटीमध्ये दिसत आहे. आज भलेही विवादित अभिनेत्री म्हणून शमिता शेट्टी आणि मुस्कान जट्टाना यांची नावे समोर आली असली, तरीही सोशल मीडियावरील फॉलोवर्सच्या बाबतीत मिलिंद सर्वांच्या पुढे आहे. त्याला इंस्टाग्रामवर ४.७ मिलियन फॉलोवर्स आहेत.

अक्षरा सिंग-
भोजपुरी सिनेसृष्टीतील सर्वात मोठी अभिनेत्री म्हणून ओळख असलेली अक्षरा सिंग देखील बिग बॉसमध्ये आहे. तिला इंस्टाग्रामवर ३.३ मिलियन लोक फॉलो करतात.

शमिता शेट्टी-
सिनेसृष्टीतील अभिनेत्री आणि शिल्पा शेट्टीची बहीण असलेल्या शमिताला इंस्टाग्रामवर २.५ मिलियन लोकं फॉलो करतात. या बिग बॉसमध्ये तिचे नाव विवादित अभिनेत्री म्हणून समोर आले आहे.

दिव्या अग्रवाल-
अभिनेत्री दिव्या अग्रवालला इंस्टाग्रामवर २.५ मिलियन लोकं फॉलो करतात.

रिद्धिमा पंडित-
‘बहू हमारी रजनीकांत’, ‘खतरो के खिलाडी’ शोमध्ये दिसलेल्या रिद्धिमा पंडिताला इंस्टाग्रामवर १.७ मिलियन लोकं फॉलो करतात.

उर्फी जावेद-
टेलिव्हिजन अभिनेत्री आणि बिग बॉस १३ ची स्पर्धक असणाऱ्या उर्फी जावेदला इंस्टाग्रामवर १.४ मिलियन फॉलोवर्स आहेत.

राकेश बापट-
टेलिव्हिजन आणि चित्रपट अभिनेता राकेश बापट याला इंस्टाग्रामवर १ मिलियन फॉलोवर्स आहेत. त्याची शमिता शेट्टीसोबत जोडी जमली आहे.

नेहा भसीन-
गायिका नेहा भसीनला सोशल मीडियावर इंस्टाग्रामवर ५ लाख २३ हजार फॉलोवर्स असून, तिची मिलिंद गाबासोबत जोडी जमली आहे.

प्रतीक सहजपाल-
बिग बॉसच्या स्टेजवरूनच अभिनेत्रींसोबत वैर पत्करलेला आणि पवित्रा पुनियाचा एक्स बॉयफ्रेंड असलेल्या प्रतीकला सोशल मीडियावर २ लाख ६४ हजार फॉलोवर्स असून त्याची अक्षरा सिंगसोबत जोडी आहे.

करण नाथ-
‘ये दिल आशिकाना’ फेम अभिनेता करण नाथला इंस्टाग्रामवर २ लाख ४९ हजार लोकं फॉलो करतात.

जीशान खान-
‘कुमकुम भाग्य’ मालिकेत महत्वाच्या भूमिकेत दिसणाऱ्या जीशान खानला इंस्टाग्रामवर २ लाख १४ हजार फॉलोवर्स आहेत.

मुस्कान जट्टाना-
सोशल मीडिया इन्फ्लुएंसर मुस्कान जट्टानाला १८४ हजार फॉलोवर्स आहे. मुस्कान या शोमध्ये सर्वत लहान स्पर्धक आहे.

निशांत भट्ट-
निशांत या शोमध्ये सर्वात कमी इंस्टाग्रामवर फॉलोवर्स असणारा स्पर्धक आहे. त्याला ९१.३ हजार लोकं फॉलो करतात.

शमिताने निशांतवर त्याने त्याची मर्यादा ओलांडल्याचे आरोप केले होते.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

आनंदाची बातमी! अभिनेत्री नयनताराने केली साखरपुड्याची पुष्टी; जाणून घ्या कोण आहे तो नशीबवान?

सोनू अभिनेत्रीसोबत करत होता ‘तुम तो ठहरे परदेसी’ गाण्यावर डान्स; मध्येच आला चाहता आणि…

मालदिवला नवऱ्यासोबत सुट्यांसाठी जात सना खानने एअरपोर्टवरच अदा केला नमाज; इंटरनेटवर व्हिडिओ व्हायरल

हे देखील वाचा