भारत-पाकिस्तान या दोन देशांचे संबंध सुरुवातीपासूनच नाजूक राहिलेले आहेत. इतर कोणत्याही क्षेत्रात नसले तरीही क्रिकेट आणि चित्रपट या दोन्ही क्षेत्रातील गोष्टींबद्दल भारत-पाक या देशातील लोकांना नेहमीच चर्चा करायला त्याबद्दल जाणून घ्यायला आवडत असते.
पुलवामा हल्ल्यानंतर भारतात पाकिस्तानी कलाकारांना बंदी करण्यात आली. मात्र मागील अनेक वर्षांपासून बॉलिवूडमधील कलाकार आणि त्यांचे पाकिस्तानी सेलिब्रिटीसोबत असणारे प्रेमसंबंध हे सर्वश्रुत आहे. प्रेमाला कोणतीही बंधने नसतात या युक्तीप्रमाणे त्यांनी देशाच्या सीमा विसरून प्रेम केले.
आज या लेखात आपण अशाच काही जोड्या बघणार आहोत ज्यांच्या प्रेमाला देशाच्या सिमा हिल रोखू शकल्या नाही.
- सुष्मिता सेन- वसीम अक्रम
मिस युनिव्हर्स असलेली सुंदर अभिनेत्री म्हणजे सुश्मिता सेन. लोकप्रिय पाकिस्तानी क्रिकेटर वसीम अक्रम हे दोघं रिलेशनशिपमध्ये असल्याच्या भरपूर बातम्या आल्या. या दोघांची भेट एका रियालिटी शो दरम्यान झाली. शूटिंगनंतर अनेकवेळा या दोघांना एकत्र पहिले गेले होते.

कदाचित त्यामुळेच अशा बातम्या येत होत्या. हे दोघ लग्न करणार असल्याच्या देखील बातम्या आल्या होत्या. मात्र, त्यानंतर सुष्मिताने सन २०१३ साली तिचे आणि वसीमचे असे कोणतेही नाते नसल्याचे स्पष्ट केले. वसीमच्या आयुष्यात आधीपासूनच एक सुंदर महिला असल्याचे सांगत तिने आम्ही फक्त चांगले मित्र असल्याचे सांगितले.
- सलमान खान- सोमी अली
बॉलिवूडचा भाईजान सलमान खान हा त्यांच्या चित्रपटांइतकाच अफेयर्स साठी सुद्धा चर्चेत असतो. आजपर्यंत सलमानच्या आयुष्यात अनेक स्त्रिया आल्या किंवा त्यांची चर्चा झाली. त्यातलीच एक पाकिस्तानी अभिनेत्री सोमी अली.

सन १९९५ सालच्या आसपास सलमान सोमी अलीसोबत रिलेशनशिपमध्ये होता. जेव्हा सोमी सलमानच्या आयुष्यात आली तेव्हा त्याचे आणि संगिता बिजलानीचे लग्न ठरले होते. पत्रिकांचे देखील वाटप झाले होते. त्याचवेळी सोनीने सलमानच्या आयुष्यात एन्ट्री केली आणि सलमान, संगीताचे लग्न मोडले. सलमान आणि सोमी अली ८ वर्ष सोबत होते.
- अश्मित पटेल- वीना मलिक
पाकिस्तानी अभिनेत्री वीणा मलिक आणि भारतीय अभिनेता अश्मित पटेल हे दोघेही काही काळ रिलेशनशिपमध्ये होते. विवादित शो बिग बॉसच्या चौथ्या पर्वात दोघेही स्पर्धक म्हणून सहभागी झाले होते. या शोच्या दरम्यानच दोघे जवळ आले. मात्र शो संपल्यानंतर काही दिवसांनी हे दोघेही वेगळे झाले.

- तमन्ना भाटिया- अब्दुल रज्जाक
साऊथ इंडस्ट्री ते बॉलीवूड असा प्रवास करणारी अभिनेत्री म्हणजे तमन्ना भाटिया. तमन्नाने अनेक हिट सिनेमात काम केले. मात्र, काही दिवस तमन्ना आणि पाकिस्तानी ऑल-राउंडर क्रिकेटर अब्दुल रज्जाक यांच्या अफेयरच्या देखील बातम्या आल्या होत्या. या दोघांचा दुबईमध्ये शॉपिंग करतानाच एक फोटो खूप वायरल झाला होता. त्यानंतर तमन्नाने यावर तिचे आणि अब्दूलचे असे कोणतेही नाते नसल्यचे सांगितले होते.

- अमृता अरोड़ा- उस्मान अफजल
बॉलिवूडपासून बऱ्याच वर्षांपासून दूर असणारी अभिनेत्री म्हणजे अमृता अरोरा. एकेकाळी अमृता आणि पाकिस्तानी मध्ये जन्म झालेला इंग्लिश क्रिकेटर उस्मान अफजल यांच्या नात्यात असल्याच्या बातम्या खूप आल्या. चार वर्ष या दोघांनी एकमेकांना डेट केले. मात्र, नंतर काही कारणांनी त्यांच्यात मतभेद झाले आणि ते वेगळे झाले.

- जीनत अमान – इमरान खान
सन ७०/८० च्या काळातील हॉट अभिनेत्री म्हणजे झीनत अमान. झीनत यांनी त्यांच्या काळात खूप हिट सिनेमे दिले. त्या एक यशस्वी अभिनेत्री होत्या. त्यातच त्यांचे आणि पाकिस्तानी माजी क्रिकेटर आणि आजचे पाकिस्तानचे प्रधानमंत्री इम्रान खान यांचे अफेयर असल्याच्या बातम्या येऊ लागल्या. काही काळ नात्यात राहून ते वेगळे झाले.
- रिना रॉय- मोहसिन खान
अभिनेत्री रीना रॉय हीने तिच्या करियरच्या यशाच्या वेळेस चित्रपटांना रामराम ठोकत पाकिस्तानी क्रिकेर मोहसीन खान सोबत लग्न केले. त्यांचे लग्न मात्र टिकले नाही काही वर्षांनी या दोघांनी घटस्फोट घेतला. यादोघांना सनम नावाची मुलगी असून सध्या तिची कस्टडी रीना यांच्याकडे आहे.










