Saturday, March 21, 2026
Home बॉलीवूड दुःखद! ‘पान सिंग तोमर’ सारख्या उत्तम चित्रपटांचे लेखन करणाऱ्या संजय चौहान यांचे निधन

दुःखद! ‘पान सिंग तोमर’ सारख्या उत्तम चित्रपटांचे लेखन करणाऱ्या संजय चौहान यांचे निधन

आजची सकाळी दुःखद ठरली. ‘पान सिंग तोमर’ सारख्या इतर अनेक सुंदर चित्रपटांचे लेखन करणारे लेखक संजय चौहान यांचे आज (१२ जानेवारी) गुरुवार रोजी मुंबईच्या एका रुग्णालयात निधन झाले. ते ६२ वर्षांचे होते. संजय मागील बऱ्याच काळापासून ते लिव्हरच्या जुन्या आजारापासून संक्रमित होते. संजय चौहान यांनी ‘पान सिंह तोमर’, ‘आय एम कलाम’ आदी अनेक उत्कृष्ट चित्रपटांचे लेखन केले होते. तिग्मांशु धूलिया यांच्या ‘साहेब बीवी गँगस्टर’चे देखील लेखन त्यांनी केले होते.

संजय चौहान यांच्या मागे त्यांची पत्नी आणि मुलगी सारा असून, चौहान रायटिंग फॅटर्निटीच्या कामात मोठ्या उत्साहाने सहभागी व्हायचे. त्यांनी त्यांच्या करियरमध्ये मोठ्या प्रमाणावर काम केले आणि कामासाठी प्रशंसा देखील मिळवली. संजय चौहान यांना २०११ साली आलेल्या ‘आय एम कलाम’ या सिनेमासाठी बेस्ट स्टोरी विभागात फिल्मफेयर पुरस्काराने सन्मानित केले गेले. ‘मैंने गांधी को नहीं मारा’ आणि ‘धूप’ आदी त्यांच्या काही उत्कृष्ट सिनेमांची नावे आहेत.

संजय चौहान यांचा जन्म आणि बालपण मध्यप्रदेश राज्याची राजधानी असलेल्या भोपाळमध्ये व्यतीत झाले. त्यांचे वडील रेल्वेत होते तर आई एक शाळेत शिक्षिका होती. संजय चौहान यांनी दिल्लीमध्ये एक पत्रकार म्हणून काम करण्यास सुरुवात केली. पुढे १९९० च्या दशकात त्यांनी सोनी टेलिव्हिजनच्या क्राइम शो असलेल्या ‘भंवर’च्या लिखाणानंतर ते मुंबईमध्ये आली. त्यांनी २००३ अली सुधीर मिश्रा यांच्या अतिशय गाजलेल्या ‘हजारों ख्वाहिशें ऐसी’ सिनेमाचे संवाद देखील लिहिले होते.

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
दैनिक बोंबाबोंबचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्त्वाच्या बातम्या-
वाढदिवसाच्या पार्टीमध्ये सतत ड्रेस सावरताना दिसली भोजपुरी स्टार आम्रपाली दुबे
हसरा चेहरा इतिहास गेहरा! गौरी नलावडेचा शाइनी लूक

हे देखील वाचा