केंद्र सरकारने यंदाची म्हणजेच 2025 चा पद्म पुरस्कारांची यादी जाहीर केलेली आहे. या वर्षी वेगवेगळ्या क्षेत्रातील अनेक नामांकित लोकांना हे पुरस्कार जाहीर झालेले आहेत. यामध्ये मनोरंजन क्षेत्रातील अनेक लोकांना देखील केंद्र सरकारकडून पद्म पुरस्कार जाहीर करण्यात आलेले आहेत. आणि त्याची यादी देखील समोर आलेली आहे. आता या यादीत मनोरंजन क्षेत्रातील कोणत्या कलाकारांना यावर्षीचे पद्म पुरस्कार जाहीर झालेले आहेत? हे आपण जाणून घेणार आहोत.
पंकज उदास
दिवंगत गायक पंकज उदास यांना केंद्र सरकारकडून पद्म भूषण पुरस्कार जाहीर करण्यात आलेला आहे. पंकज उदास यांनी त्यांच्या आवाजाने सगळ्यांनाच मंत्रमुग्ध केलेले आहे. मागील वर्षी म्हणजेच 26 फेब्रुवारी 2024 रोजी पंकज उदास यांचे निधन झाले. त्यांनी भारतीय मनोरंजन सृष्टीला अनेक प्रसिद्ध गाणी दिलेली आहेत.
शेखर कपूर
बॉलीवूडमधील अभिनेता आणि दिग्दर्शक शेखर कपूर यांना देखील केंद्र सरकारकडून यावर्षीचा पद्मभूषण पुरस्कार जाहीर करण्यात आलेला आहे. शेखर कपूर यांनी मिस्टर इंडिया तसेच मासूम यांसारख्या चित्रपटांचे दिग्दर्शन करून प्रेक्षकांच्या मनोरंजन केलेले आहे.
अजित कुमार
साउथ मधील लोकप्रिय अभिनेता अजित कुमार यांना देखील केंद्र सरकारकडून यंदाचा पद्मभूषण पुरस्कार जाहीर करण्यात आलेला आहे. अजित कुमार यांनी अनेक चित्रपटात काम करून प्रेक्षकांचे मनोरंजन केलेले आहे. अजित कुमार यांनी विवेगम, वेदालम, वलीमाई यांसारख्या अनेक चित्रपटांमध्ये काम केलेले आहे.
अरिजित सिंग
बॉलीवूडमधील प्रसिद्ध गायक अरिजीत सिंग याला देखील केंद्र सरकारकडून यावर्षीचा पद्मश्री पुरस्कार जाहीर करण्यात आलेला आहे. अरिजीत सिंग हा सध्या तरुणांच्या गळ्यातील एक ताईत झालेला आहे
त्याच्या गाण्याने सगळेच मंत्रमुग्ध होतात.
अशोक सराफ
मराठी आणि बॉलीवूडमध्ये काम करून घराघरात पोहोचलेले मराठीतील ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ यांना देखील केंद्र सरकारकडून यावर्षीचा पद्मश्री पुरस्कार जाहीर करण्यात आलेला आहे. काही दिवसांपूर्वी राज्य सरकारने अशोक सराफ यांच्या नावाची पद्म पुरस्कारासाठी शिफारस करण्यात आली होती. अशातच केंद्र सरकारने अशोक सराफ यांना पद्म पुरस्कार जाहीर केलेला आहे.
अश्विनी भिडे देशपांडे
केंद्र सरकारने यंदाच्या पद्म पुरस्कारांमध्ये प्रसिद्ध शास्त्रीय गायिका डॉक्टर अश्विनी भिडे देशपांडे यांना देखील पद्मश्री पुरस्कार जाहीर केलेला आहे. अश्विनी भिडे देशपांडे यांनी त्यांच्या शास्त्रीय गायनाने सगळ्यांनाच आतापर्यंत मंत्रमुग्ध केलेले आहे. गेल्या 22 वर्षापासून त्यांनी भारतीय परंपरेनुसार गायन संगीता आणि संस्कृती जोपासली आहे.
दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
हेही वाचा
लव्हयापा स्टार्सनी श्रीदेवी आणि आमिर खानचे नाव घेतले नाही, नक्की काय असेल कारण?
‘हे’ आहेत ममता कुलकर्णी यांची प्रसिद्ध गाणी आणि चित्रपट; आजही आहेत प्रसिद्ध