Friday, March 14, 2025
Home बॉलीवूड श्रीदेवी यांच्या हिट गाण्यावर जबरदस्त नाचली पाकिस्तानी अभिनेत्री आयजा खान

श्रीदेवी यांच्या हिट गाण्यावर जबरदस्त नाचली पाकिस्तानी अभिनेत्री आयजा खान

सौंदर्य आणि उत्कृष्ट अभिनयाच्या जोरावर हिंदी सिनेसृष्टीत आपली स्वत:ची एक वेगळी ओळख निर्माण करणाऱ्या अभिनेत्री ‘श्रीदेवी’ यांचे २०१८ साली हृदयविकाराच्या झटक्याने आकस्मिक निधन झाले. आपल्या कुटुंबीयांसह दुबईत एका लग्न समारंभासाठी गेल्या असताना ही दुर्दैवी घटना घडली. मात्र, श्रीदेवी यांचे चाहते त्यांना आजही विसरु शकले नाहीत. श्रीदेवी यांची क्रेझ आणि त्यांचे चाहते देशात आणि विदेशातही प्रचंड आहेत. श्रीदेवींची एक झलक पाहण्यासाठी चाहते अगदी जिवाच रान करायचे. आजही या ना त्या कारणाने चाहते सतत त्यांची आठवण काढताना दिसतात. श्रीदेवींचीचे चाहते बऱ्याचदा त्यांचे काही जुने व्हिडीओ शेअर करून त्यांच्या आठवणींना उजाळा देताना दिसतात. श्रीदेवी याची हुबेहूब काॅपी करू बनवलेला एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

 

बाॅलिवूड कलाकारांची क्रेज विदेशात किती मोठ्या प्रमाणात आहे हे अनेकदा आपल्याला पाहायला मिळत असते. पाकिस्तानमध्ये बॉलिवूड कलाकारांना तुफान प्रेम मिळते. अशीच एक पाकिस्तानी अभिनेत्री असणाऱ्या आयजाने श्रीदेवीच्या गाण्यावर रील्स बनवून इंस्टाग्रामवर शेअर केले आहे. हा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड धूमाकूळ घालत आहे. व्हिडीओला चाहते प्रचंड लाईक्स आणि कमेंट करत आहेत. आयजा या व्हिडिओमध्ये श्रीदेवी यांच्या ‘चांदनी’ सिनेमातील ‘मेरे हाथों में नौ-नौ चुड़ियां हैं’ गाण्यावर डान्स करताना दिसत आहे.

https://www.instagram.com/p/CUDRqedBK41/?utm_source=ig_embed&ig_rid=2b59fd55-e02f-4ba3-8471-4e4148204df8

या व्हिडीओमध्ये आयजाने गुलाबी रंगाचा ड्रेस परिधान केला आहे आणि व्हिडीओ शेअर करताना तिने लिहिले की,“गीतीचे लग्न … तुम्ही तयार आहात का?” तिच्या या व्हिडीओचे प्रचंड कौतुक होत आहे. चाहते तिच्या सौंदर्याचे कौतुक करत आहेत. तसेच तिच्या डान्सचेही कौतुक करत आहेत. श्रीदेवी यांचे चाहते हा व्हिडिओ पाहून त्यांच्या आठवणींना उजाळा देता आहेत. श्रीदेवी आज जरी आपल्यात नसल्या तरीही चाहते त्यांना विसरू शकले नाहीत.

आयजाविषयी बोलायचे झाले, तर तिने पाकिस्तान फिल्म इंडस्ट्रीत खूप काम केले आहे. ‘लापता’ या शोमध्ये आयजाने गीती नावाच्या मुलीचे पात्र निभवले आहे. या शोमध्ये आयजा बाॅलिवूड अभिनेत्रींसारखी मेकअप करते. आयजाचे पाकिस्तानी फॅन फाॅलोविंग प्रचंड आहेत. नुकतीच काही दिवसांपूर्वी आयजा पाकिस्तानमधील इंस्टाग्रामवर सर्वाधिक फॉलोअर्स असलेली अभिनेत्री ठरली आहे. ९ लाखांहून अधिक लोक तिला फॉलो करतात. याबाबतीत तिनं टॉप अभिनेत्री माहिरा खानलाही मागं सोडलं आहे.

दैनिक बोंबाबोंचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-‘केबीसी १३’मध्ये महिला स्पर्धकाने ‘बिग बीं’ना विचारला ‘हा’ प्रश्न, अभिनेते म्हणाले, ‘मी सांगणार नाही…’

-करीना कपूरने केला परफेक्ट फॅमिली फोटो शेअर, समुद्र किनारी दिसले ‘सैफिना’चे कुटुंब

-कोणी म्हणतंय ‘रावणाचा ड्रेस’, तर कोणी ‘पक्षीराज’; विचित्र आउटफिटमुळे ट्रोल झाली उर्वशी

 

हे देखील वाचा