बॉलिवूड अभिनेत्रींची जेवढी फॅन फॉलोविंग असते, तेवढीच फॅन फॉलोविंग पाकिस्तानी अभिनेत्रींची देखील आहे. पाकिस्तानची एक अशी अभिनेत्री आहे की, जी तिच्या कामासोबतच तिच्या सौंदर्यामुळे देखील प्रसिद्ध आहे. ती म्हणजे मावरा होकेन. तिने तिच्या आतापर्यंतच्या करिअरमध्ये अनेक चित्रपटात आणि मालिकांमध्ये काम केले आहे. ती बॉलिवूडमधील एका अभिनेत्याची मोठी चाहती आहे.
मावराने तिच्या करिअरची सुरुवात एका थिएटर कलाकारापासून केली आहे. मावराचा केवळ पाकिस्तानमध्येच नाही, तर संपूर्ण आशिया खंडात सर्वात सुंदर अभिनेत्रींमध्ये समावेश होतो. तिने तिच्या अभिनयाची आणि सौंदर्याची छाप भारतात सोडली आहे. ती म्हणजे ‘सनम तेरी कसम’ या चित्रपटातून. तिला या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये देखील खूप प्रसिद्धी मिळाली.
मावरा होकेन जेव्हा सातवी इयत्तेत होती, तेव्हा तिने मोठे पाऊल उचलत आपले नाव ‘हुसैन’ वरून ‘होकेन’ हे केले होते. तिने वकिलीची पदवी घेतली आहे. तिने अनेक पाकिस्तानी मालिकांमध्ये काम केले आहे. यात ‘आहिस्ता आहिस्ता’, ‘इक तमन्ना लाहसिल सी, आणि ‘निखर गय गुलाब गुलाब’ यामध्ये काम केले आहे.
मावराने एकदा सांगितले होते की, ती ‘चॉकलेट बॉय’ रणबीर कपूरची फॅन आहे. तिने सांगितले की, “ही गोष्ट जेव्हा रणबीरला समजली, तेव्हा त्याने एक व्हिडिओ शूट करून शेअर केला होता. जो खूप व्हायरल झाला होता. यावरून मी अंदाज लावते की, रणबीर कपूर जेवढा मोठा अभिनेता आहे. मी फक्त एवढंच सांगते की, मी त्याची खूप मोठी फॅन आहे आणि मला त्याच्यासोबत काम करण्याची खूप इच्छा आहे.”
मावरा हिने पाकिस्तानमधील बॅन चित्रपट ‘फँटम’ला घेऊन कमेंट केल्यानंतर सोशल मीडिया ट्विटरवर टारगेट बनली होती. पाकिस्तानमधील बालाकोटा प्रदेशात भारतीय वायू सेनेतील एअर स्ट्राइकनंतरही ती खूप चर्चेत होती. तेव्हा तिने असे म्हटले होते की, “जर आपण मानवाच्या आयुष्याबाबत बोलायला गेलो, तर युद्धामध्ये कोणीही विजेता नसतो. आपल्याला एकमेकांना भडकवले नाही पाहिजे.”
तिच्या या वक्तव्यामुळे ती आजही सर्वांच्या चर्चेत आहे. जेव्हा बॉलिवूडमधील दिवंगत ज्येष्ठ अभिनेते ऋषी कपूर यांच्यावर विदेशात उपचार चालू होते, तेव्हा मावरा त्यांना भेटायला गेली होती.
दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…