Wednesday, March 27, 2024

रस्त्यावर चक्क लाडू विकताना दिसले ‘मिर्झापूर’चे पंडितजी; चाहत्यांकडून प्रश्नांचा भडीमार

जगभरात पसरलेल्या कोरोना विषाणूच्या आजारामुळे सर्वसामान्य नागरिकांच्याच नव्हे, तर अनेक सेलेब्सच्या रोजगारावर आणि आर्थिक स्थितीवर मोठ्या प्रभाव पडला आहे. महामारीमुळे अनेक क्षेत्र त्रस्त आहेत, त्यातीलच एक आहे मनोरंजन जग. आतापर्यंत अनेक सेलिब्रिटींनी कोरोनामुळे काम न मिळाल्याबद्दल आणि प्रभावित झालेल्या त्यांच्या आर्थिक स्थितीबद्दल उघडकीस आणले आहे. दरम्यान, ‘मिर्झापूर’चे ‘पंडितजी’ अर्थातच राजेश तेलंग यांचा एक फोटो जोरदार व्हायरल होत आहे. अभिनेत्याच्या या फोटोमुळे त्यांच्या चाहत्यांची चिंता वाढली आहे. कारण, यात राजेश तेलंग रस्त्यावर दिसत आहेत.

राजेश तेलंगचा हा फोटो पाहून बरेच युजर्स त्यांना प्रश्न विचारून, चिंता व्यक्त करत आहेत. अभिनेत्याने हा फोटो स्वत: शेअर केला आहे. त्यांनी स्वत: चा हा फोटो ट्विटरवर पोस्ट केला असून, ते रस्त्यावर राम लाडूंची विक्री करताना दिसत आहेत. निळ्या रंगाच्या शर्टमध्ये उभे असलेले राजेश तेलंग, फोटोमध्ये कॅमेर्‍याकडे पाहत आहेत. यासह त्यांनी कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, “लॉकडाउन उघडावे, कोरोना गेला तर आपण पुन्हा काम सुरू करू.” याशिवाय या फोटोसह अभिनेत्याने दुसरे काही सांगितलेले नाही.

अनेक युजर्सने राजेश तेलंग यांच्या पोस्टवर कमेंट केली आहे. त्याचवेळी काहीजणांना वाटत आहे की, अभिनेत्याचा हा फोटो एखाद्या शो किंवा चित्रपटाच्या शूटिंगचा असू शकतो, तर बरेच जण त्यांना त्यांच्या आर्थिक स्थितीबद्दल विचारत आहेत.

त्याचवेळी एका युजरने विचारले, “हे कोण आहेत?” त्याला उत्तर म्हणून अभिनेता म्हणाले, “नवाब भाई, मी राजेश तेलंग आहे. एक अभिनेता. मी आशा करतो की आपण ठीक आहात. सुरक्षित राहा.” त्याचवेळी एका युजरने लिहिले, “राजेश भाई, तोपर्यत एक प्लेट राम लाडू आम्हाला देखील खाऊ घाला.” ‘मिर्झापूर’मधील राजेश तेलंग यांच्या अभिनयाची आठवण करत दुसर्‍या युजरने लिहिले, “वकिली सोडून थेट या व्यवसायात प्रवेश केलात गुरू?”

राजेश तेलंग यांनी ‘मिर्झापूर’ मध्ये ‘गुड्डू भैया’ म्हणजेच अली फजल आणि ‘बबलू भैया’ म्हणजेच विक्रांत मेस्सीचे वडील ‘पंडितजी’ ही भूमिका साकारली होती. सिरीजच्या दोन्ही सिझनमध्ये त्यांना प्रेक्षकांकडून खूप प्रेम मिळाले.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हे देखील वाचा