Monday, May 27, 2024

धक्कदायक! र‍िदा इस्‍फहानीच्या हाेणाऱ्या नवऱ्यानेच खासगी व्हिडिओ केला लीक

रिदा इस्फहानी हे पाकिस्तानी चित्रपटसृष्टीतील एक प्रसिद्ध नाव आहे. रिदाने तिच्या अभिनय आणि साैन्दार्याच्या बळावर चाहत्यांच्या मनात स्थान निर्माण केले. पण रिदा तिच्या व्यावसायिक आयुष्यासाेबतच वैयक्तिक आयुष्यामुळे जास्त चर्चेत आली. रिदा इस्फहानीचा एक खाजगी व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला हाेता. या व्हिडिओमध्ये अभिनेत्रीचे अनेक खासगी क्षण होते. अलीकडेच अभिनेत्रीने या व्हिडिओबद्दल खुलासा केला आहे, ज्यामुळे अभिनेत्री चांगलीच चर्चेत आली आहे. 

अभिनेत्री रिदा इस्फहानी (rida isfahani) हिने एका पाॅडकास्टमध्ये व्हायरल झालेल्या व्हिडिओविषयी खुलासा केला आहे. व्हायरल झालेला व्हिडिओ काेणी दुसऱ्याने नाही तर, तिच्या मंगेतरनं लीक केला हाेता. हा व्हिडीओ समोर आल्यानंतर रिदाची इमेज खूप खराब झाली होती. मात्र, तेव्हा अभिनेत्रीने यावर मौन बाळगले होते. पण आता तिने या संपूर्ण प्रकरणाचा खुलासा केला आहे.

तर झाले असे की, नोव्हेंबर 2016 मध्ये रिदाचा खाजगी व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता.या व्हिडिओ विषयी बाेलताना अभिनेत्री म्हणाली की, “हे कृत्य इतर कोणी केले नसून माझ्या मंगेतराने केले हाेते. माझा मंगेतर डायरेक्‍टर ऑफ फोटोग्राफी हाेता.”

या संपूर्ण प्रकरणाबाबत बोलताना अभिनेत्री पुढे म्हणाली, “आमच्या एंगेजमेंटला तीन वर्षे झाली होती, त्यानंतर त्याने हे कृत्य केले होते. लोकांनी मला पत्रकार परिषद घेण्यास सांगितले पण मी तसे केले नाही कारण, हे त्याचेच कृत्य होते. जर एखाद्याचा विश्वास तोडला असेल तर, हा एका व्यक्तिचा नाही तर पुर्ण मानवतेची हत्या आहे. अल्लाहसुद्धा याला माफ करणार नाही. त्याने माझा विश्वासघात केला आहे. मी माझ्या आईवडिलांना त्याच्याशी लग्न करायला मनवले हाेते. माझी मानसिकता अशी आहे की, मी फक्त एकाच व्यक्तीसोबत राहावे, त्याच्याशी लग्न करावे. पण आमच्या एंगेजमेंटनंतर, मी यूएसमध्ये असताना त्याने माझे व्हिडिओ ऑनलाइन लीक केली. आता मला यासह जगावे लागेल, मला माझ्या अल्लाहची माफी मागायची आहे, मी ते नेहमीच मागते. लोक मला माफ करत नसले तरी…” असे अभिनेत्रीने संवादादरम्यान सांगितले. ( pakistani actress rida isfahani opens up about her private viral video)

दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
व्हिडिओ: पाकिस्तानी अभिनेत्री हानिया आमिर अडकली लाेकांच्या गर्दीत, रागाने झाली लाल

आहा कडकच ना! मुख्य कालाकारांपेक्षा ‘हे’ बालकलाकार आपल्या अभिनयाने वेधतात प्रेक्षकांचे लक्ष

हे देखील वाचा