Wednesday, July 3, 2024

पत्रकाराने दिली शाहरुखला भारत सोडून पाकिस्तानमध्ये शिफ्ट होण्याची ऑफर, पाकिस्तानला गरीब म्हणत ट्रोलर्सने सांगितला शाहरुखचा खर्च

मागील अनेक दिवसांपासून शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान अंमली पदार्थांच्या केसमध्ये तुरुंगात आहे. त्याला सोडवण्यासाठी शाहरुख हरप्रकारे प्रयत्न करताना दिसत आहे. मात्र आर्यनला बाहेर काढण्याचे प्रयत्न अपयशीच होताना दिसत आहे. यासर्व प्रकरणामुळे शाहरुख खान आणि आर्यन खान चांगलेच ट्रोल देखील होत आहे. शाहरुख खान हा मोठा अभिनेता आहे. त्याचमुळे संपूर्ण जगात हे प्रकरण गाजत असून, लोकं त्यावर प्रतिक्रिया देखील देत आहेत. काही शाहरुख खानला पाठिंबा देत आहेत, तर काही त्याला चुकीचे ठरवत आहे. मात्र यासर्व प्रतिक्रियांमध्ये पाकिस्तानमधून आलेली एक प्रतिक्रिया खूपच चर्चेत आली आहे.

झाले असे की, पाकिस्तानमधील प्रसिद्ध पत्रकार आणि सूत्रसंचालक असणाऱ्या वकार जाका यांनी शाहरुखला भारत सोडून पाकिस्तानमध्ये येण्यास सांगितले आहे. यामुळे वकार जाका नेटकऱ्यांच्या निशाण्यावर आले असून, त्यांना मोठ्या प्रमाणावर ट्रोल केले जात आहे.

https://twitter.com/rjwasu07/status/1451637662188769287

 

वकार जाका यांनी त्यांच्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवरून ट्विट करत लिहिले, “शाहरुख खान सर, भारत सोडा आणि कुटुंबासोबत पाकिस्तानमध्ये या. नरेंद्र मोदी सरकार तुमच्यासोबत जे करत आहे, ते मूर्खपणाचे आहे. मी शाहरुख खानसोबत आहे.”

त्यांच्या या ट्विटवर त्यांना मोठ्या प्रमाणावर ट्रोल केले जात आहे. एकाने लिहिले की, “वकार भाई शाहरुख खान त्यांच्या सुपरकारचे कलेक्शन पाकिस्तानच्या रोडवर कसे चालवणार?” दुसऱ्याने लिहिले, “पाकिस्तान शाहरुख खानचा खर्च उचलू शकणार नाही. त्यांनी हॉलिवूडला गेले पाहिजे.” अजून एकाने लिहिले, “शाहरुखला माहिती आहे की, भारतात याचे वाईट दिवस पाकिस्तानमध्ये राहण्यापेक्षा खूप चांगले आहेत. पाकिस्तान इतका गरीब देश आहे, की त्याला थोडी कमाई देखील नाही करता येणार.”

तत्पूर्वी आर्यन खानच्या जामीन अर्जावर २७ ऑक्टोबरला सुनावणी केली जाणार आहे.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-‘कुठलंही धर्मांतर नाही, आम्ही दोघे जन्माने हिंदूच! मात्र, समीरची आई…’, क्रांती रेडेकरच्या ट्वीटने मोठा खुलासा

-आर्यन खान प्रकरण: समीर वानखेडेंनी मागितले ८ कोटी रुपये? साक्षीदाराचा मोठा आरोप

-वानखेडेंवर लावले जातायेत खंडणीचे आरोप, अभिनेत्री क्रांती रेडकरने पोस्ट करून अप्रत्यक्षपणे मांडली पतीची बाजू

हे देखील वाचा