‘पावरी हो रही है…’ या व्हिडिओने इंटरनेटवर खळबळ निर्माण करणारी पाकिस्तानी मुलगी दानानीर मुबीन आज इंटरनेटवर मोठी सेंसेशन बनली आहे. ‘पावरी हो रही है…’ एका व्हिडिओने दानानीर मुबीनचे नशीब पूर्णपणे बदलले. पाहता पाहता ती सामान्य मुलीपासून प्रसिद्ध व्यक्ती बनली. सोशल मीडिया सेंसेशन दानानीर आता अभिनयाच्या दुनियेत पाऊल ठेवणार आहे.
दानानीर तिच्या खास स्टाईलने चमकणार टीव्ही शोमध्ये
पाकिस्तानची ‘पावरी गर्ल’ दानानीर छोट्या पडद्यावरून अभिनय क्षेत्रात पदार्पण करत आहे. ‘सिन्फ-ए-आहान’ या आगामी ड्रामा सीरियलमध्ये ती दिसणार आहे. दानानीरच्या या डेब्यू शोमध्ये पाकिस्तानातील अनेक बड्या आणि प्रसिद्ध अभिनेत्री सहभागी होणार आहेत. यामध्ये सजल अली, युमना जैदी, कुबरा खान, सायरा युसूफ आणि रमशा खान यांच्या नावांचा समावेश आहे. हा ड्रामा उमरा अहमद यांनी लिहिला असून, नदीम बाग दिग्दर्शित करत आहेत.
‘पावरी गर्ल’ पडद्यावर पाहण्यासाठी चाहते आहेत उत्सुक
‘पावरी गर्ल’च्या या आगामी शो ‘सिन्फ-ए-आहान’चा ट्रेलर समोर येताच त्याला चांगला प्रतिसाद मिळाला आहे. दानानीरला पडद्यावर पाहण्यासाठी चाहते खूप उत्सुक आहेत. या शोची जबरदस्त चर्चा होत आहे. या शोमध्ये मुली आपल्या दमदार अंदाज आणि नव्या युगातील नव्या विचारांची ओळख करून देताना दिसणार आहेत.
दानानीरचा फर्स्ट लूक आवडला चाहत्यांना
‘सिन्फ-ए-आहान’ या ड्रामा सीरियलमधील दानानीरचा फर्स्ट लूकही समोर आला आहे. तिचा लूक आणि भूमिका चाहत्यांना खूप आवडते. आता एक अभिनेत्री म्हणून दनानीरला चाहत्यांचे प्रेम मिळते की नाही हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
येत्या २७ नोव्हेंबरला होणार प्रदर्शित
नुकत्याच समोर आलेल्या या टिझरने प्रेक्षकांची उत्सुकता वाढवली आहे. रोजच्या रोमान्स ड्रामा या प्रकारची महिला केंद्रित इंटेन्स कथा चाहत्यांना फ्रेश कंटेंटची आशा देते. हा शो २७ नोव्हेंबर रोजी रात्री ८ वाजता प्रसारित होणार आहे.
दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…
हेही नक्की वाचा-
-अक्षय कुमारने ‘अतरंगी रे’चे मोशन पोस्टर्स केले शेअर, धनुष-साराच्या भूमिकेचा झाला खुलासा