प्रसिद्ध अभिनेत्री श्वेता तिवारीची मुलगी पलक तिवारी लवकरच एका म्युझिक व्हिडिओमध्ये दिसणार आहे. या म्युझिक व्हिडिओचे नाव ‘बिजली बिजली’ आहे. ज्याचा फर्स्ट लूक श्वेता आणि तिच्या मुलीने सोशल मीडियावर शेअर केला होता. खूप व्हायरल होत असलेल्या या म्युझिक व्हिडिओचा फर्स्ट लूक चाहत्यांनाही खूप आवडला होता. या पोस्टरमध्ये पलक किलर लूकमध्ये दिसत आहे. ती सोशल मीडियावर देखील प्रचंड सक्रिय असते. ती नेहमीच आपले ग्लॅमरस आणि स्टायलिश फोटो चाहत्यांबरोबर शेअर करत असते.
नुकतेच श्वेता तिवारीने तिची मुलगी पलक तिवारीच्या पहिल्या म्युझिक व्हिडिओचा टीझर आपल्या इंस्टाग्राम अकाऊंटवर शेअर केला आहे. याआधी तिने या गाण्यातील तिच्या मुलीचा फर्स्ट लूक शेअर केला होता. तिने काही तासांपूर्वी टीझर शेअर केला आहे. जो सोशल मीडियावर चांगलाच पसंत केला जात आहे. आतापर्यंत हा व्हिडिओ अडीच लाखांहून अधिक लोकांनी पाहिला आहे.
हे गाणे केवळ हार्डी संधूनेच गायले नाही, तर पलक तिवारीनेही हे गाणे गायले आहे. गाण्याचे बोल जानी यांनी लिहिले आहेत. यात बी प्राकचे उत्कृष्ट संगीत आहे. टीझर पाहून चाहत्यांना वाटते की, हे गाणे ‘तितलियां’चा रेकॉर्ड मोडेल.
श्वेताच्या चाहत्यांसोबतच सेलिब्रिटीही तिच्या मुलीच्या गाण्यासाठी तिचे अभिनंदन करत आहेत. प्रत्येकजण त्याच्या मुलीच्या लूकचे कौतुक करत आहे. व्हिडिओमध्ये पलक वेगवेगळ्या लूकमध्ये दिसत आहे. हार्डी संधूचे हे गाणे ३० ऑक्टोबरला प्रदर्शित होणार आहे.
पलक लवकरच एका हॉरर चित्रपटात दिसणार आहे. या सिनेमाचे नाव ‘रोजी: द केफ्रॉन चॅप्टर’ आहे. विशाल मिश्रा या चित्रपटाचे दिग्दर्शन करत आहेत. या चित्रपटात पलक तिवारीशिवाय अरबाज खान आणि तनिषा मुखर्जी देखील दिसणार आहेत. या चित्रपटाची घोषणा २९ जुलै २०२० रोजी करण्यात आली होती.
दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…
हेही नक्की वाचा-
-लाडकी लेक पलकबरोबर विमानतळावर स्पॉट झाली श्वेता तिवारी; नेटकरी म्हणाले, ‘आई नेमकी कोण?’
-श्वेता तिवारीची मुलगी पलक झाली २१ वर्षांची; फोटो पाहून तुम्हीही म्हणाल, ‘लय भारी!’
-कधी खेळतेय केसांशी, तर कधी दाखवतेय अदा! पलक तिवारीच्या लेटेस्ट व्हिडिओने इंटरनेटचा पारा केला ‘हाय’