Friday, March 29, 2024

कधी खेळतेय केसांशी, तर कधी दाखवतेय अदा! पलक तिवारीच्या लेटेस्ट व्हिडिओने इंटरनेटचा पारा केला ‘हाय’

सुप्रसिद्ध टीव्ही अभिनेत्री श्वेता तिवारी प्रमाणेच तिची मुलगी पलक तिवारी सुद्धा प्रचंड ग्लॅमरस आहे. पलक सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. आजकाल ती तिच्या ग्लॅमरस आणि सिझलिंग फोटोंमुळे चर्चेचा विषय ठरत आहे. पलक सतत तिच्या फोटोशूटचे फोटो आणि व्हिडिओ पोस्ट करून चाहत्यांचे मने चोरते. चाहते तिच्या फोटोंना इतकी पसंती देतात की, फोटो इंटरनेटवर येताच जबरदस्त व्हायरल होतात. नुकताच पलकचा आणखी एक फोटोशूट व्हिडिओ चर्चेत आला आहे.

पलक तिवारीने तिच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर तिचा एक लेटेस्ट फोटोशूट व्हिडिओ पोस्ट केला आहे. या लेटेस्ट फोटोशूटमध्ये पलक स्ट्रीप टाइट ड्रेसमध्ये दिसत आहे. ती कॅमेऱ्यासमोर कशी पोझ देत आहे, हे तुम्ही पाहू शकता. शूट दरम्यान ती कधी बोटांनी केसांबरोबर खेळताना दिसतेय, तर कधी सिझलिंग पोझ देताना दिसते. त्याचवेळी, तिच्या बॅकग्राऊंड देखील खूप युनिक दिसत आहे. यावेळीही पलकचा हा व्हिडिओ चाहत्यांना खूप आवडला आहे. आतापर्यंत हजारो चाहत्यांनी त्याला लाईक केले आहे. चाहते या व्हिडिओवर प्रतिक्रिया देत पलकचे भरभरून कौतुक करत आहेत.

अलिकडेच, पलक तिवारीचे काही फोटो चर्चेत आले होते. या फोटोशूटचे फोटो तिने आपल्या इंस्टाग्राम अकाऊंटवर शेअर केले होते. फोटोंमध्ये तुम्ही पाहू शकता की, ती खूप ग्लॅमरस दिसत आहे.

तिचा हा लूक चाहत्यांना खूप प्रभावित करत आहे. फोटोंमध्ये आपण पाहू शकता की, पलकने गडद तपकिरी रंगाचा एक उत्कृष्ट ड्रेस परिधान केला आहे. त्याचबरोबर तिने एक मॅचिंग जॅकेट देखील तिच्याजवळ ठेवले आहे. पलकने या ड्रेससह काळ्या रंगाचा उंच बूट घातला आहे. तिचा हा बॉसी लूक तिच्या चाहत्यांना खूप आवडला होता.

दैनिक बोंबाबोंचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-ब्रेकिंग: दिग्गज अभिनेता अक्षय कुमारच्या आईने घेतला जगाचा निरोप, आज सकाळी झाले निधन

-‘हद्द झाली यार!’ सिद्धार्थ शुक्लाच्या मृत्यूवर व्लॉग बनवणाऱ्या संभावना सेठवर भडकले नेटकरी

-तो किस्सा, जेव्हा ‘या’ कारणामुळे जान्हवी कपूरला चक्क गाडीच्या डिक्कीमध्ये लागले लपावे

हे देखील वाचा