Thursday, January 15, 2026
Home बॉलीवूड पलक तिवारी लवकरच झळकणार ‘या’ हॉरर कॉमेडी चित्रपटात, अभिनेत्यानं शेअर केली पाेस्ट

पलक तिवारी लवकरच झळकणार ‘या’ हॉरर कॉमेडी चित्रपटात, अभिनेत्यानं शेअर केली पाेस्ट

टीव्ही मालिकेतील प्रसिद्ध अभिनेत्री श्वेता तिवारी हिची मुलगी पलक तिवारी लवकरच मोठ्या पडद्यावर दिसणार आहे. पलक तिवारी अभिनेता संजय दत्त सोबत ‘द व्हर्जिन ट्री‘ या हॉरर कॉमेडी चित्रपटातून प्रेक्षकांना घाबरवताना दिसणार आहे. 63 वर्षीय संजय दत्त, रॉकस्टार एंटरटेनमेंटसह त्याच्या बॅनर थ्री डायमेंशन मोशन पिक्चर्स प्रायव्हेट लिमिटेडद्वारे निर्माता म्हणून अभिनेता दीपक मुकुटच्या सोहमला सपोर्ट करेल.

चित्रपटात ‘या’ दमदार कलाकारांचा समावेश
निर्मात्यांनी एका निवेदनात म्हटले आहे की, “वनुक्ष अरोरा (vankush arora) आणि सिद्धांत सचदेवा (siddhant sachdeva) यांनी लिहिलेल्या या चित्रपटाचे दिग्दर्शन सिद्धांत सचदेवा करणार आहेत. चित्रपटात काम करणाऱ्या कलाकारांमध्ये अभिनेता सनी सिंग (sani singh), अभिनेत्री मौनी रॉय (mouni roy), पलक तिवारी (palak tiwari), आसिफ खान (asif khan) यांचा समावेश आहे.”

संजय दत्त (sanjay dautt) याने एका निवेदनात म्हटले आहे की, “मी ज्या चित्रपटाच्या शोधात होतो त्याचे समर्थन करताना मला आनंद होत आहे की, हा चित्रपट कॉमेडी आणि हॉररने परिपुर्ण आहे. दीपक मुकुट सारखा प्रोडक्शन पार्टनर मिळाल्याने मला खूप आनंद झाला आहे, ज्याची सिनेमाची दृष्टी आणि आदर्श माझ्याशी जुळतात.”

संजय दत्त पुढे म्हणाले की,”मला नेहमीच चित्रपट जगतातील तरुण कलागुणांना प्रोत्साहन द्यायचे होते.” यावेळी दीपक मुकुट म्हणाले की, “बॉलीवूड अभिनेत्यासोबत भागीदारी करण्यात मला आनंद आहे कारण ते दोघेही समान रचनात्मक दृष्टीकोन सादर करतात.”

संजय दत्तचे वर्कफ्रंट
संजय दत्तच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचे झाले तर, या वर्षात तो अनेक चित्रपटांमध्ये दिसला आहे. यामध्ये ‘केजीएफ चॅप्टर 2′,’ब्राम्हास्त्र’ सारख्या ब्लॉकबस्टर चित्रपटांचा समावेश आहे. याशिवाय तो ‘शमशेरा’, ‘सम्राट पृथ्वीराज’मध्येही दिसला होता. दोन्ही चित्रपट बॉक्स ऑफिसवर फारसे चालले नसले तरी संजय दत्तने आपल्या अभिनयाने चाहत्यांचे मने जिंकली. लवकरच संजय दत्त ‘द गुड महाराज’ आणि ‘घुडछडी’ सारख्या चित्रपटांमध्येही दिसणार आहे.

दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
तब्बल 3 वर्षानंतर प्रियंकाचे भारतामध्ये आगमन, आल्याबरोबर व्यक्ती केली भावनिक पोस्ट

‘वयाच्या 12 व्या वर्षापासून करतेय बॉडी शेमिंगचा सामना’, अभिनेत्री केला मोठा खुलासा

हे देखील वाचा