Monday, July 15, 2024

‘केस तो बनता है’ शोमध्ये संजय दत्तला आठवले कठीण दिवस; म्हणाला,’त्यावेळी वाट लागली’

चित्रपटसृष्टीत संजू बाबा या नावाने प्रसिद्ध असलेला संजय दत्त अनेकदा कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत असतो. नुकताच तो रितेश देशमुख आणि वरुण शर्मा याच्या शो ‘केस तो बनता है‘मध्ये पोहोचला होता. या एपिसोडमध्ये संजूवर अनेक आरोप लावण्यात आले होते. त्याचवेळी, अभिनेत्यानेही या सर्व आरोपांना आपल्या शैलीत खुलेपणाने उत्तर दिले.

यासंबंधीचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. व्हिडिओमध्ये संजय (sanjay dutt) जुने दिवस आठवताना त्या कठीण क्षणांबद्दल स्पष्टपणे सांगत आहे. संजू बाबाची ही स्टाईल चाहत्यांच्या पसंतीस उतरली आहे.

संजय दत्तची लागली हाेती वाट
व्हिडिओमध्ये दिसत आहे की, शोमध्ये जजच्या खुर्चीवर बसलेली कुशा कपिला संजय दत्तला विचारते की, “संजू तुझ्यावरील सर्व आरोप विचित्र आहेत, तुला तुझ्या स्पष्टीकरणात काही सांगायचे आहे का?” यावर संजय दत्त म्हणतो की, “पहिल्यांदाच माझ्यावर कोर्टात मजेशीर आरोप केले आहेत. याआधीही माझ्यावर नेहमीच नॉन फनी आरोप केले आहेत.” पुढे संजय सांगतो की, “त्यावेळी माझी वाट लागली होती.” या व्हिडिओ क्लिपमध्ये संजय लगे रहो मुन्ना भाईची भूमिका करताना दिसत आहे.

‘खलनायक’च्या रिमेकमध्ये रणवीरने भूमिका साकारू नये
यादरम्यान वरुण शर्माने संजय दत्तला विचारले की, “जर येत्या काळात खलनायकाचा रिमेक बनवला गेला तर या तीन स्टार्सपैकी कोणाला हे पात्र साकारू नये असे तुम्हाला वाटते. रणवीर सिंग, रणबीर कपूर की विकी कौशल?” या प्रश्नाच्या उत्तरात संजय दत्त म्हणाला, “रणवीर सिंग आजकाल कपडे घालत नाही.” संजयने हा विनोद रणवीर सिंगच्या न्यूड फोटोशूटवर केला होता.ज्यामुळे बॉलीवूडमध्‍ये पुर्वी बरेच वाद झाले होते.

संजय दत्त लवकरच दिसणार ‘केडी – द डेव्हिल’ चित्रपटात
संजय दत्तच्या वर्कफ्रंट विषयी बाेलायचे झाले, तर तो ध्रुव सर्जा यांच्या कन्नड चित्रपट ‘केडी – द डेव्हिल’ मध्ये मुख्य भूमिकेत दिसणार आहे. या चित्रपटापूर्वी तो ‘KGF Chapter 2’ मध्येही दिसला होता, जो ब्लॉकबस्टर चित्रपट ठरला होता. याशिवाय तो रणबीर कपूरसोबत ‘शमशेरा’ चित्रपटामध्येही दिसला होता.

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
हेही वाचा-
‘मोहब्बतें’ चित्रपटाला 22 वर्षे पूर्ण, यश राज फिल्मसने शेअर केली पोस्ट

तापसीने पुन्हा केला पॅपराझींचा सामना; यावेळी रागाने म्हणाली, ‘असे करू नका’

 

हे देखील वाचा