Monday, December 23, 2024
[aioseo_breadcrumbs]

पलक तिवारीचा सोशल मीडियावर जलवा, मरून ब्रालेटमध्ये दिसतीये एकदम हॉट

बॉलिवूडमधील अनेक कलाकार आपले वेगवेगळ्या लूकमध्ये फोटोशूट करून चाहत्यांसमोर येतात. चाहत्यांना देखील त्यांना नव्या लूकमध्ये बघायला नेहमी आवडत. अशातच बॉलिवूडमधील अभिनेत्री पलक तिवारी देखील तिच्या चाहत्यांना तिच्या वेगवेगळ्या लूकची झलक दाखवत असते. तिचा हॉट अंदाज पुन्हा एका चर्चेत आला आहे. सोशल मीडियावर तिने तिचे काही फोटो शेअर केले आहेत.

पलकने अधिकृत इंस्टाग्राम अकाऊंटवरून काही फोटो शेअर केले आहेत. या फोटोशूटमध्ये पलक तिवारी बोल्ड आणि हॉट दिसत आहे. तिने मरून कलरची ब्रालेट घातली आहे. त्याच्याबरोबर तिने काळ्या रंगाची पॅन्ट घातली आहे. या अंदाजात ती बसून पोज देताना दिसते. हा फोटो शेअर करताना तिने लिहिले आहे की, “जसे लाना डेलने सांगितले, जसे मी तुम्हाला सांगितले, ते तुम्हाला समजले नाही, तुम्हाला जर समजले नसेल, तर मग सोडून द्या.” तुम्ही तिचा दुसरा फोटोत आपण पाहू शकतो की, तर ती हातात कॅमेरा घेऊन आहे. (palak tiwari share her new photos on social media)

तिच्या सगळ्या फोटोमध्ये पलक बसून पोज देताना दिसत आहे. ती या लूकमध्ये खूप स्लिमफिट दिसत आहे. तिचे हे फोटो सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होताना दिसत आहेत. अनेकांना तिचा हा लूक खूप आवडला आहे. अनेकजण या फोटोवर त्यांच्या प्रतिक्रिया देत आहेत.

पलक नुकतेच ‘बिजली बिजली’ गाण्यामध्ये आपल्याला दिसली. हे गाणे हार्डी सिंधूनी गायले होते. या गाण्याच्या खूप लोकप्रियतेनंतर पलक चाहत्यांची लाडकी बनली. ती सोशल मीडियावर खूप सक्रिय आहे.

पलक तिवारी लवकरच चित्रपटात झळकणार आहे. ती विवेक ओबेरॉयबरोबर स्क्रीन शेअर करताना दिसणार आहे. पलक तिवारी श्वेता तिवारीची मुलगी आहे. या मायलेकींचे फोटो आणि व्हिडिओ अनेकवेळा सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसतात.

हेही वाचा :

तर ‘या’ कारणामुळे अभिनेत्री सोहा अली खान होती इतके वर्ष अभिनयापासून लांब

उलटा शर्ट आणि उघडे बटन उर्फीचा नवा लूक पुन्हा एकदा तिची फॅशन पाहून भडकले नेटकरी

परिणीती चोप्राच्या भावाने उघडले रेस्टॉरंट, अभिनेत्री म्हणाली ‘मस्त खाल्ली बिर्याणी, दाल मखनी..’

हे देखील वाचा