सध्या देशभरात फक्त विवेक अग्निहोत्री दिग्दर्शित ‘द काश्मिर फाइल्स‘ चित्रपटाचीच चर्चा पाहायला मिळत आहे. या चित्रपटाने कमाईचे अनेक नवनवे रेकॉर्ड प्रस्थापित केले आहेत. काश्मिर फाइल्स चित्रपटाच्या यशाबरोबरच या चित्रपटात अभिनय करणाऱ्या कलाकारांचेही सर्वत्र कौतुक केले जात आहे. यामध्ये चित्रपटात दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री यांच्या पत्नीने म्हणजेच पल्लवी जोशीने साकारलेल्या भूमिकेचे सर्वत्र कौतुक होत आहे. चित्रपटात तिने राधिका मेनन नावाची भूमिका साकारली आहे. नकारात्मक भूमिका करुनही सर्वत्र तिच्या अभिनयाचे कौतुक केले जात आहे. पल्लवी जोशीने याआधीही हिंदी चित्रपट जगतात अनेक दमदार भूमिका साकारल्या आहेत. आपल्या दिग्दर्शनासाठी प्रसिद्ध असलेल्या विवेक अग्निहोत्री आणि पल्लवी जोशीची प्रेमकथाही तितकीच सुंदर आहे. आज (4 एप्रिल) पल्लवी जोशीचा वाढदिवस, जाणून घेऊया त्यांच्या या गोड प्रेमाची भन्नाट स्टोरी.
4 एप्रिल 1969 रोजी मुंबईत जन्मलेल्या पल्लवी जोशीने लहान वयातच रंगमंचावर अभिनय करण्यास सुरुवात केली आणि ‘बदला’ आणि ‘आदमी सडक का’ सारख्या चित्रपटांमध्ये बालकलाकार म्हणून काम केले होते. याशिवाय पल्लवी जोशीने ‘अल्पा विराम’ या टीव्ही मालिकेत बलात्कार पीडितेची भूमिका साकारली होती. या व्यक्तिरेखेने तिने प्रेक्षकांच्या मनावर एक वेगळी छाप सोडली. याशिवाय अभिनेत्री पल्लवी 90 च्या दशकात तहलका, मुजरिम आणि सौदागर सारख्या चित्रपटांमध्येही दिसली होती. पल्लवी जोशी आणि विवेक अग्निहोत्री यांच्या लवस्टोरीची एका कार्यक्रमातून सुरूवात झाली होती. अभिनेत्री पल्लवी जोशी आणि विवेक अग्निहोत्री एका रॉक कॉन्सर्ट दरम्यान भेटले, जिथे त्यांना एका मित्राने आमंत्रित केले होते. पल्लवीला सुरुवातीला विवेक अग्निहोत्री आवडत नव्हचा कारण ती त्याला गर्विष्ठ व्यक्ती मानत होती, पण नंतर दोघांची मैत्री झाली.
एका वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत विवेक अग्निहोत्रीने सांगितले होते की, दोघेही एका कॉन्सर्टमध्ये भेटले होते, आम्ही दोघेही एकमेकांना ओळखत नव्हतो पण एक गोष्ट कॉमन होती की त्या कॉन्सर्टमध्ये दोघेही कंटाळले होते. पुढे, हळूहळू पल्लवी आणि विवेक एकमेकांना वैयक्तिक आणि व्यावसायिकदृष्ट्या खूप चांगले ओळखू लागले. आणि त्यांच्या प्रेमकथेला सुरूवात झाली. यानंतर दोघांच्या भेटीची मालिका वाढत गेली आणि तीन वर्षे एकमेकांना डेट केल्यानंतर त्यांनी कायमचे एकत्र राहण्याचा म्हणजेच लग्न करण्याचा निर्णय घेतला. अशा प्रकारे पल्लवी आणि विवेक अग्निहोत्री यांचा विवाह 28 जून 1997 रोजी झाला. त्यांना दोन मुलेही आहेत.
पल्लवी जोशी आणि विवेक अग्निहोत्री हे दोघेही कलाविश्वातून आले आहेत, त्यांची कामे वेगळी असली तरी त्यांनी एकत्र अनेक चित्रपटात काम केली आहेत. पल्लवी जोशी एक अभिनेत्री आणि निर्माती आहे. पल्लवीने तिचा पती विवेक अग्निहोत्रीसोबत ‘द कश्मीर फाइल्स’ या चित्रपटातही काम केले आहे आणि प्रत्येक कार्यक्रमात ती त्याच्यासोबत दिसत असते.
दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
जाहिरातींमधून अभिनय काराकिर्दीची केली सुरुवात; आज आहेत बाॅलिवूडचे प्रसिद्ध स्टार्स, एकदा पाहाच यादी
रवी किशन यांच्या सिनेसृष्टीतील अंमली पदार्थांवरील ‘त्या’ वक्तव्यावरून जया बच्चन यांनी त्यांना सुनावले होते खडेबोल