Wednesday, July 2, 2025
Home बॉलीवूड दुःखद! संतूरवादक पंडीत शिवकुमार शर्मा यांचे निधन

दुःखद! संतूरवादक पंडीत शिवकुमार शर्मा यांचे निधन

भारतीय संगीत क्षेत्रातील मोठे नाव आणि ‘संतूर’ या वाद्याला जागतिक ओळख मिळवून देणाऱ्या पंडित शिवकुमार शर्मा यांचे आज (१० मे) रोजी हृदयविकाराच्या धक्क्याने दुःखद निधन झाले आहे. ते ८४ वर्षांचे होते. संतूर या वाद्याला भारतात आणि जगभरात लोकप्रिय बनवण्याचे श्रेय पंडित शिवकुमार शर्मा यांनाच दिले जाते.

 

पंडित शिवकुमार शर्मा यांनी बासरीवादक हरिप्रसाद चौरासिया यांच्यासोबत मिळवून अनेक चित्रपटांना संगीत दिले. त्यात ‘सिलसिला’, ‘फासले’, ‘चांदणी’, ‘लम्हे’, ‘डर’ आदी हिट चित्रपटांचा समावेश आहे. पंडित शिवकुमार शर्मा यांना संगीत नाटक अकादमी पुरस्कार, भारताचा तिसरा सर्वोच्च नागरी सन्मान ‘पद्मभूषण’ आणि चौथा सर्वोच्च नागरी सन्मान ‘पद्मश्री’ पुरस्कार सुद्धा प्रदान करण्यात आला होता. पं. शिवकुमार शर्मा यांच्यामागे पत्नी मनोरमा आणि पुत्र राहुल शर्मा असा परिवार आहें.

त्यांच्या निधनाचे वृत्त समजताच अनेक दिग्गज मंडळी सोशल मीडियाच्या माध्यमातून त्यांना श्रद्धांजली वाहत आहे. काश्मीरमधील ‘संतूर’ या लोकवाद्याला अभिजात संगीताचा दर्जा देण्यात पंडित शिवकुमार शर्मा यांनी मोलाची भूमिका निभावली होती.

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

हेही वाचा-

 

 

 

हे देखील वाचा