सध्या सर्वत्र कोरोना व्हायरसचा शिरकाव वाढत असल्याचे दिसत आहे. याचप्रमाणे टीव्ही आणि बॉलिवूड विश्वातून देखील कलाकारांना कोरोनाची लागण झाल्याच्या बातम्या येऊ लागल्या आहेत. अशात आता टीव्हीवरील लोकप्रिय शो ‘पांड्या स्टोअर’मधील चार कलाकारांना एकाच वेळी कोरोनाची लागण झाल्याचे वृत्त आहे. शुक्रवारी (७ जानेवारी) या चारही कलाकारांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला आहे.
अक्षय खरोडिया, सिमरन बुधरूप, मोहित परमार आणि ॲलिस कौशिक अशी कोरोनाची लागण झालेल्या या चार कलाकारांची नावे आहेत. या सर्वांमध्ये कोरोनाची सौम्य लक्षणे आहेत. शोमधील इतर कलाकारांचा अहवाल निगेटिव्ह आला आहे.
‘पांड्या स्टोअर’मध्ये ॲलिस कौशिक (Alice Kaushik) रावीची भूमिका स्वीकारत आहे. अक्षय खरोडिया (Akshay Kharodia) देवाच्या भूमिकेत, सिमरन बुधरूप (Simran Budharup) ऋषिताच्या भूमिकेत आणि मोहित परमार (Mohit Parmar) कृषच्या भूमिकेत आहे. हे सर्व कलाकार विलगीकरणात आहेत. माध्यमांतील वृत्तांनुसार, एका सूत्राने सांगितले की, ‘कलाकारांचा कोरोना अहवाल आज पॉझिटिव्ह आला आहे. या सर्वांमध्ये कोरोनाची सौम्य लक्षणे असून ते सर्वजण घराबाहेर आहेत.’
‘पांड्या स्टोअर’च्या स्टोरी लाईनमध्ये होणार बदल
सूत्राने पुढे सांगितले की, ‘देवाच्या कृपेने, शोमधील इतर कलाकारांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत. या चौघांच्या अवतीभवती कथा फिरत असल्याने या शोमध्ये सध्या सुरू असलेल्या ट्रॅकवर परिणाम होणार असून, त्यात बरेच बदल करावे लागतील. शोचे शूटिंग सॅनिटायझेशनसाठी थांबवण्यात आले असून, शोचे शूटिंग लवकरच सुरू होणार आहे.’
बीएमसीला दिली माहिती
‘पांड्या स्टोअर’चे निर्माते सुंजॉय वाधवा आणि कोमल सुंजॉय वाधवा म्हणाले की, “पांड्या स्टोअर या टीव्ही शोचे कलाकार ॲलिस कौशिक, अक्षय खारोडिया, सिमरन बुधरूप आणि मोहित परमार यांचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. या सर्वांना वैद्यकीय मदत मिळत असून, त्यांना आयसोलेशनमध्ये ठेवण्यात आले आहे. बीएमसीला कळवण्यात आले आहे आणि सेट प्रोटोकॉलनुसार फ्युमिगेट (धुरी देऊन शुद्ध करणे) करण्यात आले आहेत. आम्ही संपूर्ण टीमच्या सतत संपर्कात आहोत कारण त्यांचे आरोग्य हे आमचे प्राधान्य आहे.”
‘पांड्या स्टोअर’ला मिळत आहे चांगले रेटिंग
‘पांड्या स्टोअर’चे निर्माते पुढे म्हणाले, “आम्ही सुरक्षेबाबत आमच्या वचनबद्धतेवर ठाम आहोत आणि अधिकाऱ्यांनी घालून दिलेले सर्व नियम पाळले जातील याची खात्री करू.”
‘पांड्या स्टोअर’ हा तमिळ शो ‘पांडियन स्टोर्स’चा रिमेक आहे. हा शो २५ जानेवारी, २०२१ रोजी सुरू झाला आणि सुरुवातीपासूनच त्याला रेटिंग चांगले मिळत आहे.
हेही नक्की वाचा-
- ‘या’ व्यक्तीने बिग बॉस फेम अर्शी खानच्या पोटात मारला जोरदार पंच, विव्हळत कोसळली खाली
- Video: देश बदललाय पण संस्कार तेच! परदेशी स्वयंपाक्यालाही प्रियांकाने आरती करायला शिकवले
- परिणीती चोप्राच्या भावाने उघडले रेस्टॉरंट, अभिनेत्री म्हणाली ‘मस्त खाल्ली बिर्याणी, दाल मखनी..’
हेही पाहा-