Wednesday, July 2, 2025
Home अन्य नव्यानेच सुरू झालेल्या टीव्ही मालिकेच्या सेटवर लागली भीषण आग! लाखोंचे साहित्य जळून खाक, कलाकार सुखरुप

नव्यानेच सुरू झालेल्या टीव्ही मालिकेच्या सेटवर लागली भीषण आग! लाखोंचे साहित्य जळून खाक, कलाकार सुखरुप

सध्या मालिका, चित्रपटाच्या सेटला आग लागण्याच्या अनेक घटना घडत आहेत. काही दिवसांपूर्वीच गोरेगावच्या फिल्म स्टुडिओला आग लागली होती. आग लागण्याचे प्रमाण वाढत असतानाच मनोरंजन क्षेत्रातून अजून एक बातमी आली आहे.

साधारण महिन्याभरापूर्वी सुरू झालेल्या स्टार प्लसच्या ‘पांड्या स्टोर’ या मालिकेच्या सेटला आग लागली आहे.
या मालिकेने केवळ महिन्याभरातच प्रेक्षकांच्या पसंतीची पोचपावती मिळवली. शो चा एक चांगल्याप्रकारे चालू असताना, अचानक पहाटेच्या सुमाराच सेटला आग लागली. या शोमधील अभिनेत्री कृतिका देसाईने सोशल मीडियावर सेटवर आग लागल्याचा एक व्हिडिओ पोस्ट केला होता. मात्र, काहीवेळाने तिने हा व्हिडिओ लगेच डिलीट देखील केला.

चांगली बातमी अशी की, या आगीत कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र, मोठ्या प्रमाणावर वित्तहानी झाल्याचे वृत्त आहे. आग लागल्याचे कारण अद्यापही समजले नसून, त्याबद्दल चौकशी चालू आहे. अचानक झालेल्या या घटनेमुळे मालिकेची संपूर्ण टीम हादरली आहे. यादरम्यान लाखोंची संपत्ती जळून खाक झाल्याचे म्हटले जात आहे. सध्या मालिकेची शूटिंग बंद असून, लवकरच ती सुरू होणार असल्याचे समजत आहे.

‘पांड्या स्टोर’ ही मालिका सुपरहिट तमिळ मालिका ‘पांडियन स्टोर्स’चा रिमेक आहे. या हिंदी मालिकेमध्ये शायनी दोशी आणि किंशुक महाजन हे मुख्य भूमिका साकारत आहे. ‘पांड्या स्टोर्स’ ही कौटुंबिक मालिका आहे.

मालिकेची कथा नावाप्रमाणेच ‘पांड्या स्टोर’ या दुकानाभोवती फिरते. गौतम म्हणजेच किंशुक महाजनच्या वडिलांचे निधन होते, आणि त्यांच्या ‘पांड्या स्टोर’ची संपूर्ण जबाबदारी गौतमवर येते. चांगले शिक्षण असूनही, केवळ वडिलांच्या दुकानासाठी गौतम हे दुकान चालवतो.

दैनिक बोंबाबोंचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-अखेर गुड न्यूज आलीच.! करिना आणि सैफ दुसऱ्यांदा झालेत आई-बाबा; पाहा कोण आलंय जन्माला, युवराज की युवराज्ञी?

-सैफ अली खानवर फिदा होती परिणीती, तर ऋतिक रोशन होता ‘या’ अभिनेत्रीचा क्रश; जाणून घ्या बॉलिवड कलाकारांचे क्रश

-लव्ह, रिलेशनशीप आणि आत्महत्या…? जिया खानच्या मृत्यूचं आजवर न सुटलेलं कोडं!

हे देखील वाचा