अनेक लोक स्टार बनण्याचे स्वप्न घेऊन बॉलिवूड इंडस्ट्रीत येतात. इंडस्ट्रीत काम मिळवणं आणि स्वत:ची वेगळी ओळख निर्माण करणं सोपं नसतं, असं अनेकदा म्हटलं जातं. पण, इरादे मजबूत असतील तर काहीही अवघड नाही. छोट्या शहरांमधून आणि खेड्यांमधून आलेल्या या स्टार्सनी हे सिद्ध केलं आहे. आपल्या दमदार अभिनयाने त्यांनी इंडस्ट्रीत एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. चला तर मग जाणून घेऊया या स्टार्सबद्दल…
आपल्या दमदार अभिनयासाठी ओळखल्या जाणाऱ्या कलाकारांच्या यादीत पंकज त्रिपाठीचे नाव समाविष्ट आहे. हा अभिनेता मूळचा बिहारमधील बेलसंड या छोट्याशा शहराचा आहे. तिथून बाहेर पडल्यानंतर त्याने आपल्या अभिनयाच्या जोरावर चित्रपटसृष्टीत वेगळे स्थान निर्माण केले आहे. पंकज बॅक टू बॅक सुपरहिट चित्रपट देऊन प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहे. सध्या अभिनेता त्याच्या आगामी ‘मैं अटल हूं’ या चित्रपटामुळे चर्चेत आहे.
विद्या बालनने आपल्या अभिनयाने प्रेक्षकांच्या मनात एक खास स्थान निर्माण केले आहे. अभिनेत्रीचा जन्म केरळमधील पलक्कड जिल्ह्यातील पुथूर नावाच्या गावात झाला. तेथून बॉलीवूडपर्यंतचा तीचा प्रवासही संघर्षाने भरलेला होता. आज बॉलिवूडच्या प्रसिद्ध अभिनेत्रींच्या यादीत विद्याचा समावेश होतो.
प्रसिद्ध विनोदी अभिनेत्यांच्या यादीत संजय मिश्राचे नाव सामील आहे. कलाकार त्यांच्या विनोदी कौशल्याने प्रेक्षकांचे भरपूर मनोरंजन करतात. बिहारमधील दरभंगा येथील एका मध्यमवर्गीय कुटुंबात संजयचा जन्म झाला. आपल्या प्रतिभेच्या आणि जिद्दीच्या जोरावर त्यांनी एक उत्कृष्ट अभिनेता म्हणून स्वतःची ओळख निर्माण केली. त्यांना चित्रपटसृष्टीतही ज्ञान नव्हते, त्यांनी स्वत:चा ठसा उमटवला.
एकेकाळी सुरक्षा रक्षक म्हणून काम करणारा नवाजुद्दीन सिद्दिकी आज परिचयाची गरज नाही. NSD पासआउट नवाजुद्दीनने आपल्या टॅलेंटच्या जोरावर बॉलिवूडमध्ये खूप नाव आणि संपत्ती कमावली आहे. तो उत्तर प्रदेशातील मुझफ्फरनगर जिल्ह्यातील बुढाणा या छोट्या शहरातील रहिवासी आहे.
दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
हेही वाचा-
सिनेसृष्टीवर शोककळा! प्रसिद्ध अभिनेत्याचे प्लेन क्रॅशमध्ये दोन चिमुरड्या मुलींसह निधन
सरोगसीवर भाष्य करणार ‘डिलिव्हरी बॉय’, अखेर चित्रपटाचा टिझर झाला रिलीझ