Sunday, December 22, 2024
[aioseo_breadcrumbs]

‘पापा कहते है’ मधील ‘ही’ अभिनेत्री आठवते का? चित्रपटसृष्टी सोडून परदेशात बनलीये व्यवसायिका

पापा कहते हैं‘ या सिनेमात  १९९६ मध्ये तुम्ही मयुरी कानगोला पाहिलं असेल. या चित्रपटाने तिने खूप ओळख मिळवली. चित्रपटात जुगल हंसराज मयुरी कांगोसोबत दिसला होता. या चित्रपटातील मयुरीवर चित्रित केलेले गाणे चांगलेच गाजले. या चित्रपटानंतर मयुरी इतर अनेक चित्रपटांमध्येही दिसली. जसे की- ‘नसीब’, ‘बेताबी’, ‘होगी प्यार की जीत’ इत्यादी पण मयुरीला तिला पाहिजे तसे यश मिळाले नाही असे म्हणतात. यामुळेच २००९ साली मयुरी कांगोने फिल्मी जगताला रामराम ठोकला.

मयुरी कांगो तिच्या शेवटच्या ‘कुर्बान’ चित्रपटात अतिशय छोट्या भूमिकेत दिसली होती. या चित्रपटात सैफ अली खान आणि करीना कपूर मुख्य भूमिकेत होते. चित्रपटांनंतर मयुरीने टीव्ही मालिकांमध्येही नशीब आजमावले. ‘किसी रोज’, ‘डॉलर बहू’, ‘किट्टी पार्टी’, ‘कुसुम’, ‘करिश्मा – द मिरॅकल ऑफ डेस्टिनी’ यांसारख्या टीव्ही मालिकांमध्येही ती दिसली होती. मात्र, २००४ मध्ये मयुरीनेही टीव्ही इंडस्ट्रीला रामराम ठोकला. मयुरीचे लग्न २००३ मध्ये एनआरआय आदित्य ढिल्लनसोबत झाले होते. लग्नानंतर मयुरी पतीसोबत न्यूयॉर्कला शिफ्ट झाली. २०११ मध्ये मयुरीला मुलगी झाली.

माध्यमातील वृत्तानुसार, मयुरीने अमेरिकेतील एका प्रसिद्ध बिझनेस स्कूलमधून एमबीए केले आहे. मयुरी २०१९ पासून गुगल इंडियासोबत काम करत आहे. मयुरी गुगल इंडियामध्ये इंडस्ट्री हेड पदावर आहे.

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

हेही वाचा-

 

हे देखील वाचा