Saturday, April 20, 2024

‘पापा कहते हैं’पासून ते ‘हानिकारक बापू’पर्यंत वडिलांवरील प्रेम व्यक्त करणारी ‘ही’ आहेत हिट गाणी

आयुष्याच्या प्रत्येक वाटेवर आपल्याला योग्य मार्गदर्शन करणारी आपली खरी समीक्षक व्यक्ती म्हणजे आपले वडील. प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यात वडील सर्वात मोठी आणि महत्त्वाची भूमिका निभावत असतात. त्यांचा घरात कितीही दरारा असला, धाक असला, तरीही ‘बाबा घरात आहे’ या वाक्यामुळे खूपच सुरक्षित वाटते. आपल्या सर्वांच्या आयुष्यातील सगळ्यात पहिले ‘हिरो’ म्हणजे आपले वडील. त्यांच्याबद्दल आपल्या मनात असलेल्या भावना व्यक्त करण्याचा दिवस म्हणजे ‘फादर्स डे.’ प्रत्येकांच्याच आयुष्यात त्यांच्या वडिलांची एक वेगळी भूमिका असते. हिंदी चित्रपटातील गाण्यातून देखील वडिलांबद्दलचे प्रेम अनोख्या पद्धतीने व्यक्त होताना आपण पाहिले, ऐकले आहे. जाणून घेऊया अशाच काही गाण्यांबद्दल.

पापा मेरे पापा
अजय देवगण आणि सुश्मिता सेन यांच्या ‘मैं ऐसा ही हूं’ या सिनेमातील ‘पापा मेरे पापा’ हे गाणे अतिशय सुंदर आणि भावनिक आहे. मानसिक रुग्ण असलेला बाप आपल्या मुलीचा ताबा मिळवण्यासाठी करत असणारे प्रयत्न या सिनेमात दाखवले गेले आहे. सोनू निगम, श्रेया घोषाल आणि बेबी अपर्णा यांनी हे गाणे गायले आहे.

तू मेरा दिल, तू मेरी जान
‘अकेले हम अकेले तुम’ सिनेमातील ‘तू मेरा दिल, तू मेरी जान’ हे गाणे कोणाला आवडणार नाही, असे कधीच होणारच नाही. एका वडिलांच्या मुलांबद्दल असलेल्या भावना या गाण्यातून व्यक्त होतात. उदित नारायण यांच्या आवाजाने या गाण्याला एक वेगळी उंची प्राप्त झाली आहे.

पापा कहते हैं बड़ा नाम करेगा
‘कयामत से कयामत तक’ सिनेमातील ‘पापा कहते हैं बडा़ नाम करेगा’ हे गाणे आजही प्रेक्षकांमध्ये लोकप्रिय आहे. उदित नारायण यांच्या आवाजातील हे गाणे आमिर खानवर चित्रित झाले आहे.

तुझको ना देखूं तो जी घबराता है
अक्षय कुमारच्या ‘जानवर’ सिनेमातील सुनिधी चौहान, उदित नारायण त्यांच्या आवाजातील ‘तुझको ना देखूं तो जी घबराता है’ हे गाणे मुलगा आणि वडिलांमधील प्रेम दाखवते.

पिता से है नूर
‘बॉस’ सिनेमातील सोनू निगमच्या आवाजातील ‘पिता से है नूर’ हे गाणे अतिशय भावनिक आणि वडिलांबद्दलच्या भावना समर्पकरीत्या व्यक्त करणारे आहे.

दिलबरो
आलिया भटच्या ‘राजी’ सिनेमातील हर्षदीप कौर, विभा सराफ, शंकर महादेवन यांच्या आवाजातील ‘दिलबरो’ हे गाणे वडील आणि मुलीच्या नात्यातील प्रेम दाखवते.

हानिकारक बापू
आमिर खानच्या ‘दंगल’ सिनेमातील ‘हानिकारक बापू’ हे गाणे अतिशय सुंदर आहे.

मुलींच्या भविष्यासाठी स्वतः वाईट होऊनही मुलांना चांगल्या दिशेला नेण्यासाठी प्रयत्न करणाऱ्या वडिलांबद्दलच्या मुलांच्या भावना दाखवल्या आहेत.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-यूट्यूब व्हिडिओने केली करिअरची सुरुवात; आज हनी सिंग आहे कोट्यवधी संपत्तीचा मालक; आलिशान गाड्यांची लागलीय लाईन

-वडिलांच्या प्रेम आणि त्यागावर आधारित हिंदी चित्रपट, ज्यांनी दिली अनोखी ओळख; ‘फादर्स डे’निमित्त घ्या जाणून

-जेव्हा राजेश खन्नांनी अमिताभ यांना विचारले, ‘सुपरस्टार झाल्यावर कसे वाटते?’; ‘या’ शब्दांत दिली होती ‘बिग बीं’नी प्रतिक्रिया

हे देखील वाचा