सध्या साेशल मीडियावर जया बच्चन यांचा पॅपराझींवर ओरडतानाचा व्हिडिओ प्रचंड व्हायरल हाेत आहे. असाच एक व्हिडिओ काही दिवसांपूर्वी व्हायरल झाला होता, ज्यामध्ये तापसी पन्नू पॅपराझींवर ओरडताना दिसली हाेती. अलीकडेच आयुष्मान खुरानाने आयोजित केलेल्या दिवाळी पार्टीत तापसी पोहोचली तेव्हा पॅपराझींनी तिला ‘ मॅडम आज ओरडू नका’ असे सांगितले. यावर तापसीने हसून तिच्याच शैलीत उत्तर दिले.
आयुष्मान खुराना (ayushmann khurrana) याने अलीकडेच दिवाळीनिमित्त एका पार्टीचे आयोजन केले होते. या पार्टीत त्यांचे अनेक खास मित्र दिसले. या पार्टीसाठी तापसी (taapsee pannu) नेही हजेरी लावली होती. ती गाडीतून खाली उतरली तेव्हा पॅपराझींनी तिच्या मागच्या अनुभवाला अनुसरुन सांगितले की, “मॅडम आज ओरडू नका.” हे ऐकल्यानंतर तापसी पहिल्यांदा हसली आणि म्हणाली, “तुम्ही अशे कृत्ये करणार नसाल, तर मी ओरडणार नाही.” यानंतर तापसीने हसत हसत फोटोग्राफर्सना अनेक पोज दिल्या.
View this post on Instagram
दिवाळी पार्टीसाठी तापसीने पारंपरिक गेटअप केला होता. व्हिडिओमध्ये तापसीने लाल कॉटनची साडी नेसली होती, ज्याला सुंदर सोनेरी रंगाची बॉर्डर आहे. याशिवाय तिने डिझायनर मोठे कानातले घातले होते, जे तिचा लूकला अधिक सुंदर बनवत हाेत. महत्वाच म्हणजे तापसीने केसांमध्ये बन टाकला हाेता जाे सर्वाचे लक्ष वेधत हाेता. या व्हिडिओमधील लूक चाहत्यांना आवडला असून चाहते व्हिडिओवर लाईक आणि कमेंट्सचा वर्षाव करत आहेत.
काही दिवसांपूर्वी, एका चित्रपटाच्या प्रदर्शनातून बाहेर पडताना, तापसी पॅपराझींवर चिडली होती. राजू श्रीवास्तव यांना त्यांच्या मृत्यूबद्दल काही विचारले असता ते म्हणाले, “काय बोलू?”. याआधी तिने मीडियाच्या एका प्रश्नावर म्हटले होते की, “प्रश्न विचारण्यापूर्वी काही हाेमवर्क करुन येत जा.” असे असले, तरी दिवाळीच्या पार्टीत तापसी शांत होती आणि तिने पॅपराझींवर नाराजी दाखवली नाही.
दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सऍप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बोंबाबोंबचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
काय सांगता! नयनतारा अन् विग्नेशचं 6 वर्षांआधी झालंय लग्न? जाणून घ्या खरं काय ते
विवाहित असूनही राज बब्बर पडले होते ‘या’ अभिनेत्रीच्या प्रेमात; पुढे अशाप्रकारे थाटला होता संसार