Monday, July 8, 2024

उर्फीच्या पार्टीमध्ये पाेहचला एक्स बाॅयफ्रेंड,अभिनेत्रीने शेअर केली भन्नाट पाेस्ट

सोशल मीडियावर सतत चर्चेत असणारी उर्फी ​​जावेदअनेकदा तिच्या हटके फॅशन सेन्समुळे चर्चेत असते. ती दररोज वेगवेगळ्या प्रकारच्या आउटफिट्समध्ये फॅशन प्रयोग करत असते. कधी उर्फी तिच्या हटके कपड्यांनी लोकांची मने जिंकते, तर कधी तिला ट्रोलिंगचाही सामना करावा लागतो. मात्र, आता उर्फी तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आली आहे. बर्‍याच लोकांना हे माहित असेल की, एकेकाळी उर्फी जावेद आणि पारस कालनावत रिलेशनशिपमध्ये होते आणि नंतर दोघांचे ब्रेकअप झाले. काही वेळा दोघेही एकमेकांना टोमणे मारताना दिसतात पण उर्फी जावेदच्या प्री-बर्थडे सेलिब्रेशन पाेस्टने सर्वांनाच धक्का दिला आहे. 

उर्फी जावेदच्या प्री-बर्थडे सेलिब्रेशनमध्ये दिसला पारस कालनावट 
शुक्रवारी (दि. 14 ऑक्टाेबर) उर्फी जावेद (urfi javed) हिने तिच्या इन्स्टाग्राम स्टोरीवरून एक फोटो शेअर केला आहे, ज्यामध्ये ती पारस कालनावत (paras kalnawat) सोबत दिसत आहे. दोघांचे चेहरे आनंदाने फुललेले आहे, यावरून ते दोघे किती आनंदी आहेत, हे दिसून येते. ही पोस्ट शेअर करताना उर्फीने एक आश्चर्यकारक गिफ देखील शेअर केल आहे, जणू काही तिलाच स्वतःवर विश्वास बसत नाही. उर्फीची ही पोस्ट शेअर करत पारस कालनावतने लिहिले, “काही तासांपूर्वी.”

PARAS BHUSHAN KALNAWATउर्फी म्हणाली लव्ह यू पारस
उर्फी जावेदच्या प्री-बर्थडे सेलिब्रेशनला अनेक जवळच्या मित्रांनी हजेरी लावली, त्यानंतर ती खूप भावूक झाली. हा व्हिडीओ तिच्या इन्स्टा स्टोरीवर पोस्ट करत पारस कालनावतने लिहिले, “कोणी असे रडते का? मी तुला 15 तारखेलाही शुभेच्छा देतो.” ही पोस्ट शेअर करत उर्फीने लिहिले, “लव्ह यू पारस.”

उर्फी जावेदचा वाढदिवस 15 ऑक्टोबरला 
उर्फी जावेदचा वाढदिवस 15 ऑक्टोबरला आहे. यावेळी ती तिचा 25 वा वाढदिवस साजरा करणार आहे. पारस आणि उर्फीच्या ब्रेकअपनंतर दोघेही एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करताना दिसले हाेते. सध्या दोघांचे नाते चांगले चालले आहे, त्यामुळे त्यांच्या चाहत्यांसाठी ही आनंदाची बाब आहे.

दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्त्वाच्या बातम्या-
सुप्रीम कोर्टाने जीतेंद्र यांच्या लेकीला झाप झाप झापलं; म्हणाले, ‘असल्या वेबसीरिजमुळे तुम्ही तरुण पिढी…’

एरिका फर्नांडिसचा बिकिनी लूक

हे देखील वाचा