Friday, July 5, 2024

तब्बल ४० वर्षांनंतर परेश रावल करणार गुजराती चित्रपटात काम, ‘डिअर फादर’च्या ट्रेलरने घातला धुमाकूळ

परेश रावल(Paresh Rawal)  हे हिंदी चित्रपट जगतातील आघाडीचे अभिनेते म्हणून ओळखले जातात. आपल्या दमदार अभिनयाने ते या क्षेत्रात अनेक वर्ष प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहेत. आता तब्बल 40 वर्षानंतर ते गुजराती चित्रपटात काम करणार आहेत. काय आहे परेश रावल आणि गुजरातचे नाते चला जाणून घेऊ.

अभिनेते परेश रावल हे हिंदी चित्रपट जगतातील दमदार कलाकार म्हणून प्रसिद्ध आहेत. त्यांनी गुजराती चित्रपटांतून आपल्या अभिनयाला सुरुवात केली होती. त्यानंतर त्यांनी हळूहळू आपला मोर्चा हिंदी चित्रपटांकडे वळवला. अभिनय क्षेत्राबरोबरच ते कुशल राजकारणी म्हणूनही प्रसिद्ध आहेत. 1982 मध्ये त्यांनी ‘नसीब नी बलहारी’ या गुजराती चित्रपटात शेवटचे काम केले होते. त्यानंतर तब्बल 40 वर्षानंतर ते पुन्हा गुजराती चित्रपटात काम करणार असून त्यांचा ‘डिअर फादर’ चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. नुकताच या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित करण्यात येणार आहे.

https://www.youtube.com/channel/UCpcsv3Ow-8IhoUGDEfPetsQ

‘डिअर फादर’ चित्रपटाचे वैशिष्ट्य म्हणजे खुद्द परेश रावल यांनी लिहिलेल्या ‘डिअर फादर’ नाटकाचा तो गुजराती भाषेतील चित्रपट आहे. त्यामुळे हा चित्रपट परेश रावल यांच्यासाठी आणखीनच खास बनला आहे. या चित्रपटात काम करण्यास उत्सुक असलेले परेश रावल म्हणतात की ” हे डिअर फादर नाटक माझ्यासाठी खूप महत्वाचे आहे. मला खूप वर्षापासुन या नाटकावर चित्रपट तयार करण्याची इच्छा होती. या सुंदर नाटकाचा अनेक लोकांपर्यंत प्रसार व्हावा अशीच माझी इच्छा होती. मला या नाटकामुळे माझ्या मातृभाषेत काम करण्याची संधी मिळत आहे त्यामुळे मी खूप खुश आहे”.

या नाटकाची कथा तीन प्रमुख भूमिकांच्या भोवती फिरते. यामध्ये आपल्या सुनेच्या त्रासाने त्रस्त झालेला सासरा दाखविण्यात आला आहे ज्याची सून खूप छळ करत असते. त्यामुळे त्यांच्यात मतभेद होत असतात. ज्या वेळी या कथेतील सासर्‍याचा अपघात होतो आणि घरचा शोध घेत घेत पोलिस येतात तेव्हा तेव्हा त्यांच्या अपघात झालेल्या सासर्‍यांच्या सारखाच हुबेहुब तो पोलिस अधिकारी दिसत असतो जिथून या कथेला सुरुवात होते. चित्रपटात परेश रावल यांच्यासोबत प्रसिद्ध गुजराती अभिनेते चेतन धनानी आणि मानसी पारेख यांनी प्रमुख भूमिका साकारल्या आहेत. परेश रावल यांचा हा बहुचर्चित चित्रपट 4 मार्चला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

हे देखील वाचा