Sunday, December 3, 2023

परिणीती चोप्रा आणि राघव चड्डा यांच्या लग्नाच्या विधींना सुरुवात, फोटो आले समोर

अभिनेत्री परिणीती चोप्रा आणि राघव चढ्ढा यांचा साखरपुडा सोहळा पार पडला आहे. तेव्हापासून त्यांच्या लग्नाची चर्चा जोरात सुरू आहे. आता परिणीतीच्या लग्नाची तारीखही जवळ आली आहे. अशा स्थितीत परिणीतीच्या घरी लग्नाची उत्सुकता आहे. परिणीती चोप्रा आणि राघव चड्ढा यांच्या लग्नाच्या विधी बुधवारपासून सुरू झाल्या आहेत. परिणीती आणि राघवच्या लग्नाचे फोटोही सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.

या फोटोंमध्ये परिणीती आणि राघव अरदास सोहळ्यात एकत्र दिसत आहेत. परिणीती आणि राघव लवकरच लग्नबंधनात अडकणार आहेत. येत्या 24 सप्टेंबरला दोघेही विवाहबंधनात अडकणार आहेत. अशा परिस्थितीत लग्नाचे विधीही जोरात सुरू आहेत. दुपारी परिणीतीचा विवाह होणार आहे. लग्नाचे विधी आतापासूनच सुरू झाले आहेत. परिणीतीच्या घरी नातेवाईकांची गर्दी झाली आहे. तसेच या लग्नाच्या निमित्ताने परिणीतीचे चाहतेही खूप उत्सुक आहेत. परिणीतीच्या लग्नाच्या विधींचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

तिची बहीण प्रियंकाप्रमाणेच परिणीती चोप्रानेही लग्नाचे ठिकाण म्हणून सुंदर राजस्थान निवडले आहे. परिणीती आणि राघवचे लग्न 24 सप्टेंबर रोजी उदयपूर येथे होणार आहे. त्यासाठीची तयारी जोरात सुरू आहे. परिणीतीच्या घरातील सदस्यही या लग्नासाठी खूप उत्सुक आहेत. परिणीती आणि राघवही विधी पार पाडल्यानंतर लवकरच उदयपूरला पोहोचतील.

परिणीतीच्या अरदास सोहळ्याचे फोटोही सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. ज्यामध्ये परिणीती तिचा भावी पती राघव चढ्ढासोबत बसून प्रार्थना करताना दिसत आहे. परिणीती आणि राघवने गुलाबी रंगाचे कपडे घातले आहेत. या वेडिंग ड्रेसमध्ये परिणीती खूपच सुंदर दिसत आहे. मेहंदीचा रंगही परिणीतीच्या हाताला चांगलाच शोभतो.

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

हेही वाचा-

बॉलिवूडमधील ‘या’ सुपरहिट चित्रपटांना नाकारून करीना कपूरने केली मोठी चूक, आज होतोय पश्चाताप
सनातन धर्माबद्दल टीका करणे प्रकाश राज यांना पडले महाग, लोकांनी दिली जीवे मारण्याची धमकी

हे देखील वाचा