Wednesday, July 3, 2024

अखेर तारीख ठरलीच तर! ‘या’ दिवशी परिणीती चोप्रा आणि राघव चड्ढा करणार साखरपुडा

बॉलिवूड अभिनेत्री परिणीती चोप्रा मागील अनेक दिवसांपासून तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे सतत चर्चेत येत आहे. तिच्या लग्नाबद्दल अनेक बातम्या मीडियामध्ये गाजत आहे.परिणीती चोप्रा आणि आम आदमी पार्टीचे नेते राघव चड्ढा यांच्या लग्नाबाबत गेल्या अनेक दिवसांपासून मीडियामध्ये विविध बातम्या येत होत्या. अनेकदा परिणीती आणि राघव यांना विविध ठिकाणी स्पॉट केले गेले. मात्र मधेच त्यांच्या लग्नाच्या बातम्या येणे बंद झाले. आता मात्र अचानक त्यांच्या लग्नाबद्दल एक माहिती समोर आली आहे. या दोघांकडून या बातम्यांवर कोणतीही अधिकृत माहिती समोर आली नसली तरी लवकरच ते साखरपुडा करणार असल्याचे समजत आहे.

एका मोठ्या वृत्तपत्राच्या दाव्यानुसार राघव आणि परिणीती हे येत्या १३ मे रोजी नवी दिल्लीत हे दोघं साखरपुडा करणार असल्याचे सांगितले जात आहे. याआधी त्या दोघांनी रोका केल्याच्या देखील बातम्या आल्या होत्या. सध्या परिणीती आणि राघव त्यांच्या कामात व्यस्त असून ते १३ मे ला साखरपुडा करणार आहे. शिवाय परिणीती आणि राघव लवकरच म्हणजे येत्या ऑक्टोबर महिन्यात लग्न करणार असल्याची माहिती देखील समोर येत आहे.

एका माहितीनुसार “परिणीती आणि राघव यांनी एका कौटुंबिक कार्यक्रमात रोका केला असून, आता ते साखरपुडा करणार असून, ऑक्टोबर महिन्यात लग्न करणार आहे. त्या दोघांना कोणत्याही गोष्टीची घाई नसून, ते प्रत्येक काम शांततेत आणि सुरळीत करणार आहे. सध्या ते कामात व्यस्त असून लवकरच त्यांचे काम पूर्ण करणार आहे.” दरम्यान काही दिवसांपूर्वी परिणीतीचा एक व्हिडीओ व्हायरल झाला होता. त्या व्हिडीओत तिच्या हातात अंगठी दिसली आणि त्यावरून त्यांनी साखरपुडा केल्याचा कयास लावण्यात आला होता.

परिणीती चोप्राची चुलत बहीण अभिनेत्री प्रियांका चोप्रा देखील भारतात असून, ती देखील या साखरपुड्याला हजर राहणार असल्याचे सांगितले जात आहे.

दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सऍप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बोंबाबोंबचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
‘TDM’ सिनेमाला स्क्रीन मिळत नसल्याने कलाकारांना अश्रू अनावर, दिग्दर्शक म्हणाले, “अशा भेदभावामुळे माझी चित्रपट बनवण्याची… ”

‘नुकतेच मी माझे घर विकले’ आर्यन खानचा ब्रँड म्हणजे निव्वळ मस्करी, किंमती एकल तर हैराण व्हाल

हे देखील वाचा