Saturday, July 27, 2024

‘TDM’ सिनेमाला स्क्रीन मिळत नसल्याने कलाकारांना अश्रू अनावर, दिग्दर्शक म्हणाले, “अशा भेदभावामुळे माझी चित्रपट बनवण्याची… ”

महाराष्ट्रात राहून मराठी चित्रपटांना चित्रपटगृह न मिळणे किंवा प्राइम टाइम हा काही नवीन मुद्दा नाही. अनेक चांगल्या आणि मोठमोठ्या चित्रपटांना या समस्येला सामोरे जावे लागले आहे. अनेक राजकीय नेते मोठ्या कलाकारांनी या विरोधात आवाज उठवला, आंदोलनं केली मात्र काहीच मार्ग निघालेला नाही. यामुळे अनेक लहान मात्र उत्तम अशा चित्रपटांचे मोठे नुकसान होत आहे. मागच्या शुक्रवारी अर्थात २८ एप्रिल रोजी प्रदर्शित झालेल्या भाऊराव कऱ्हाडे दिग्दर्शित ‘टीडीएम’ या चित्रपटाला देखील याच गोष्टीचा मोठा फटका बसला आहे.

सिनेमा प्रदर्शित झाल्यानंतर त्याला प्रेक्षकांनी चांगला प्रतिसाद दिला. मात्र अनेक ठिकाणी ‘टीडीएम’ सिनेमाचे शो कॅन्सल केले जात आहे. सिनेमाला प्राईम टाईम मिळत नसल्याचे दिग्दर्शक भाऊराव कऱ्हाडे आणि त्यांच्या टीमने सांगितले. प्रमोशनवेली एका चित्रपटगृहांमध्ये पोहचलेल्या भाऊराव कऱ्हाडे, मुख्य अभिनेता पृथ्वीराज थोरात आणि अभिनेत्री कालिंदी यांना प्रेक्षकांशी बोलताना रडूच कोसळले. सध्या त्यांचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.

यावेळी दिग्दर्शक भाऊसाहेब कऱ्हाडे म्हणाले, “आम्हाला शोसाठी वेळ द्या. आमचा सिनेमा चालला नाही तर घेऊ नका, पण कमीतकमी आमचा सिनेमा लोकांना पाहू तर द्या आणि मग त्यांनाच ठरवू द्या तो कसा आहे. या चित्रपटगृहाचेच घ्या आमचा चित्रपट पाहायला एवढे लोकं इथे आले आहेत आम्ही त्यांना विनंती केली की आम्हाला आणखी एक शो द्या, पण त्यांनी तो दिला नाही. हा भेदभाव आमच्यासोबत होत आहे. त्यामुळे आता माझी चित्रपट बनवण्याची इच्छा राहिलेली नाही. लोकांना चित्रपट बघायचा असूनही त्यांना बघू दिला जात नाही. आम्ही जेव्हा वितरकांना याबद्दल विचारले तेव्हा सांगितले की आम्हाला वरून आदेश आहे आमच्या चित्रपटाचा एकच शो दाखवायचा. आमचा चित्रपट पाहिलेल्या एकही व्यक्तीने चित्रपटावर टीका केलेली नाही, त्यामुळे आमच्याबरोबर हा भेदभाव करणे चुकीचे आहे.”

यावेळी या सिनेमात मुख्य भूमिका करणारा पृथ्वीराज थोरात म्हणाला, “तुम्हीच हा चित्रपट मोठा करू शकता, आम्हाला शो मिळत नाही. आम्ही तुम्हा सर्वांना विनंती करतोय की आमच्या कष्टाचे चीज होऊ द्या. यासाठी तुम्ही सर्वांनी मदत करा. चित्रपट खूप चांगला आहे, तो लोकांनी पाहायला हवा, आम्ही दुसऱ्या चित्रपटांबद्दल काहीच बोलत नाही. लोकांना ठरवू द्या कोणता चित्रपट चांगला आहे,”

तर या सिनेमाची अभिनेत्री असलेल्या कालिंदीनेही हात जोडूत सर्वांना विनंती केली की सर्वांनी एकदा सिनेमा थिएटरमध्ये जाऊन पाहावा आणि मग ठरवा की सिनेमा चांगला आहे की नाही. यावेळी बोलताना तिला रडू कोसळले.

दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सऍप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बोंबाबोंबचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
अनुराग बसूने कंगनाला दिली ‘अशी’ ट्रेनिंग, इंडस्ट्रीत 17 वर्षे पूर्ण केल्याबद्दल अभिनेत्रीला आठवले जुने दिवस

सलमान खान लग्नासाठी नाही, तर मुलासाठी करतोय प्लॅनिंग; म्हणाला, ‘कायदा बदलला नाही, तर…’

हे देखील वाचा