कधीकाळी अनुष्कासाठी काम करणाऱ्या परिणीतीचे काही महिन्यातच पालटले नशीब; पुढे बनली स्टार अभिनेत्री


‘नशिबात जे लिहिलेले असते ते घडतेच’, हे अगदी बरोबर आहे. कोणाचे नशीब कधी, कुठे आणि कसे पालटेल हे कोणालाच सांगता येत नाही. याचे अनेक उदाहरण आपल्याला आपल्या हिंदी सिनेसृष्टीमध्ये दिसतील. अनेक लोकं ऑफ कॅमेरा काम करायला आले. मात्र, फ्रंट कॅमेरा काम करू लागले. दुसरीकडे काही लोकं अभिनय करायला आले आणि ऑफ कॅमेरा काम करू लागले. बऱ्याच कलाकारांना हा अनुभव आला आहे. याचे मुख्य उदाहरण म्हणजे अभिनेत्री परिणीती चोप्रा.

परिणीती आज बॉलिवूडच्या टॉप अभिनेत्रींमध्ये गणली जाते. ती तिच्या जिवंत अभिनयाने प्रेक्षकांचे मनं जिंकण्यात यशस्वी झाली आहे. सुरुवातीला प्रियांका चोप्राची बहीण ही ओळख असणाऱ्या परिणितीने मेहनतीने या ग्लॅमर क्षेत्रात स्वतःचे नाव तयार केले. अनेक हिट सिनेमे देणाऱ्या परिणितीची सुरुवात अगदी सहज आणि सोपी झाली असेल, असे बऱ्याच लोकांना वाटत असेल. मात्र, असे बिलकुल नाहीये.

सोशल मीडियावरील प्रश्न- उत्तरांच्या सेशनमध्ये परिणितीने तिच्या फॅन्सने तिला विचारलेल्या सर्व प्रश्नांची अगदी दिलखुलास उत्तरं दिली. यावेळी तिला एका फॅनने विचारले की, “अनुष्का शर्मा या तुझ्या लेडी क्रशबद्दल काहीतरी सांग.” यावर परिणितीने लिहिले की, “माझ्यात आणि अनुष्कामध्ये एक खूप खास नाते आहे. ज्या प्रॉडक्शन हाऊसने अनुष्काला या इंडस्ट्रीमध्ये लाँच केले होते, त्याच प्रॉडक्शन हाऊसमध्ये मी मार्केटिंग टीममध्ये काम करायची. दरम्यान अनुष्काचा ‘बँड बाजा बारात’ सिनेमा प्रदर्शनासाठी सज्ज होता. त्यावेळी मी या सिनेमासाठी अनुष्काच्या मुलाखतीचे काम सांभाळायची. त्यानंतर लगेच पुढच्या तीन महिन्यात मी ‘लेडीज वर्सेज रिकी बहल’ सिनेमामध्ये तिची सहकलाकार झाले. किती भारी ना? तेव्हापासूनच मी नेहमी अनुष्काकडे बघत असते.”

परिणितीच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचे झाले, तर तिचे ‘द गर्ल ऑन द ट्रेन’, ‘सायना’ आणि ‘संदीप और पिंकी फरार’ हे तीन सिनेमे प्रदर्शित झाले आहे. लॉकडाऊन असल्याने हे तिन्ही सिनेमे OTT वर प्रदर्शित झाले. आगामी काळात परिणीती ‘ऍनिमल’ सिनेमात रणबीर कपूरसोबत दिसणार आहे.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-परिणीती चोप्राचा समुद्र किनाऱ्यावरील ग्लॅमरस फोटो व्हायरल, बहीण प्रियांका चोप्राचा असा झाला जळफळाट

-उर्वशी रौतेलाकडून मोठी चूक; तब्बल ७२ तासांपासून वाट पाहणाऱ्या चाहत्यांची अभिनेत्रीने हात जोडून मागितली माफी

-आहा कडकच ना! ‘लुट गए’ गाण्यावर पोरीचा जबरदस्त डान्स, मिळाले १ कोटीपेक्षाही अधिक व्ह्यूज


Leave A Reply

Your email address will not be published.