Saturday, April 19, 2025
Home बॉलीवूड परिणीती आणि राघव यांनी लग्नावर केला पाण्यासारखा पैसा खर्च? अभिनेत्रीने खर्चावर सोडले मौन

परिणीती आणि राघव यांनी लग्नावर केला पाण्यासारखा पैसा खर्च? अभिनेत्रीने खर्चावर सोडले मौन

परिणीती चोप्रा (Parineeti CHopra) आणि राघव चड्ढा यांचा विवाह 2023 मध्ये उदयपूरच्या लीला पॅलेसमध्ये झाला. या भव्य लग्नाला अनेक चित्रपट आणि राजकीय व्यक्तींनी हजेरी लावली होती. त्यांच्या लग्नात पाण्यासारखा पैसा खर्च झाल्याचा दावा मीडिया रिपोर्ट्समध्ये करण्यात आला होता. लग्नात आलेल्या पाहुण्यांसाठी बुक केलेल्या हॉटेलच्या खोल्यांचे रात्रीचे भाडे १० लाख रुपये असल्याचे सांगण्यात आले. यावरून या जोडप्यावर बरीच टीका झाली होती. आता नुकतेच परिणीतीने यावर मौन सोडले आहे.

परिणीती चोप्रा म्हणाली की, लग्नाच्या खर्चाबाबतचे दावे केवळ अफवा आहेत. आणि या टीका फक्त एका राजकारण्याशी लग्न झाल्यामुळे झाल्या. परिणीती म्हणाली की, लग्नात मोठ्या खर्चाबाबत केलेले दावे चुकीचे आहेत. राघव राजकारणी असल्यामुळेच या अफवा पसरवल्या जातात. परिणीतीने तिच्या भव्य लग्नाबाबतच्या काही अंदाजांबद्दल बोलताना अनेक तथ्ये उघड केली. त्याचवेळी राघव चढ्ढा यांनी लग्नाच्या खर्चाबाबत पसरवण्यात आलेल्या खोट्या बातम्यांनाही फेटाळून लावले आणि 7 स्टार हॉटेलमध्ये नव्हे तर उदयपूरमधील 5 स्टार हॉटेलमध्ये लग्न झाल्याचे सांगितले.

राघव चढ्ढा म्हणाले, ‘ज्या ठिकाणी आमचे लग्न झाले ते 7-स्टार हॉटेल नव्हते, जसे सांगितले जात आहे. ते एक पंचतारांकित हॉटेल होते. आम्ही एकूण 40-50 खोल्या बुक केल्या होत्या. यापैकी एकाही खोलीचे भाडे 10 लाख रुपये नव्हते. या पूर्णपणे खोट्या गोष्टी आहेत आणि आमचे लग्न महागडे वाटावे म्हणून काही लोकांनी हे जाणूनबुजून सांगितले.

परिणीती चोप्राने सांगितले की, राघव चढ्ढासोबत लग्न केल्यानंतर तिला लोकांच्या दुटप्पीपणाचा सामना करावा लागला. अभिनेत्री म्हणाली की जर तिने एखाद्या अभिनेत्याशी किंवा व्यावसायिकाशी लग्न केले असते तर तिला अशा टीकेला सामोरे जावे लागले नसते. मग सर्वजण या खर्चाची आणि भव्यतेची प्रशंसा करतील. ती पुढे म्हणाली, ‘पण माझे एका राजकारण्याशी लग्न झाले आहे, अचानक ही गोष्ट अशी बनली आहे की त्याने एकट्याने सर्व खर्च उचलला आणि जणू काही त्याला लग्नाचा खर्च परवडत नाही.

दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा 

हेही वाचा

अमोल पालेकर यांच्याकडे राहून केली होती नाना पाटेकर यांनी भूमिकेसाठी तयारी; जाणून घ्या कोणता होता चित्रपट…
५० च्या दशकात बोल्ड फोटोशूट करणाऱ्या बेगम पारा यांची कहाणी; संजय लीला भन्साळी यांनी या चित्रपटात दिली होती संधी…

हे देखील वाचा