Monday, February 26, 2024

पतीला सोडून गर्ल गॅंगसोबत परिणीती चोप्रा पोहचली मालदीवला, समुद्रातील फोटो केले शेअर

अभिनेत्री परिणीती चोप्रा सध्या मालदीवमध्ये सुट्टी घालवत आहे. लग्नानंतर परिणीती पहिल्यांदाच सुट्टीवर गेली असून विशेष म्हणजे तिचा पती राघव चढ्ढा तिच्यासोबत गेला नाही. इंस्टाग्रामवर तिच्या व्हेकेशनची स्टोरी पोस्ट करताना, जिथे आधी परिणीतीने स्पष्ट केले होते की ती तिच्या गर्ल गॅंगसोबत ट्रीपला गेली आहे, आता स्वतःचा एक सुंदर फोटो पोस्ट करून, अभिनेत्रीने ती कोणासोबत सुट्टी घालवत आहे हे उघड केले आहे.

परिणीती चोप्राने तिच्या अधिकृत इंस्टाग्रामवर एक फोटो पोस्ट केला आहे. या फोथोट परिणीती काळ्या रंगाचा स्विम सूट घालून पूलमध्ये आराम करताना दिसत आहे. यादरम्यान अभिनेत्री तिच्या बांगड्याही फ्लॉंट करताना दिसत आहे. परिणीतीने फोटोसोबत कॅप्शनमध्ये लिहिले आहे – ‘मी हनीमूनवर नाही, फोटो माझ्या वहिनीने क्लिक केला आहे.’

नुकतीच परिणिती चोप्रा लॅक्मे फॅशन वीकमध्ये रॅम्पवर चालताना दिसली. लग्नानंतर अभिनेत्री पहिल्यांदाच रॅम्पवर चालली. यावेळी तिच्या नववधूच्या लूकने चाहत्यांचे लक्ष वेधून घेतले होते. परिणिती तिच्या हातात सिंदूर आणि हातात फिकट गुलाबी बांगड्या असलेली पांढरी चमकदार साडी घातली होती. लेयर्ड नेकलेस आणि रिंग्ससह तिने तिचा लूक पूर्ण केला.

वर्क फ्रंटबद्दल बोलायचे झाले तर, परिणीती चोप्रा नुकत्याच प्रदर्शित झालेल्या अक्षय कुमारच्या ‘मिशन रानीगंज’ या चित्रपटात दिसली आहे. यानंतर ती तिच्या आगामी ‘अमर सिंह चमकीला’ या चित्रपटात दिसणार आहे. हा चित्रपट 2024 साली प्रदर्शित होणार आहे.

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

हेही वाचा-

मुलांना डान्स शिकवण्यासाठी हेमा मालिनीने सुरु केली डान्स अकॅडेमी, जाणून घ्या सविस्तर माहिती
हेमा मालिनी यांच्या ७५ व्या वाढदिवशी बॉलिवूड कलाकारांनी लावली हजेरी, पाहा सुंदर फोटो

हे देखील वाचा