Monday, July 1, 2024

परिणीती चोप्राला प्रचंड आवडतो सैफ अली खान; म्हणाली, ‘…मी लगेच हो म्हणू शकते’

बॉलिवूडमध्ये अनेक कलाकरांना दुसरे कलाकार आवडत असतात. काहीजण त्यांच्यावर प्रेम करतात तर काहींचे क्रश असतात. तसं पाहायला गेलं तर कलाकारांवर लाखो-करोडो चाहते प्रेम करत असतात. पण काही खास व्यक्ती असतात ज्या खूप चर्चेत असतात. आपण अनेकवेळा बॉलिवूडमधील क्रश तसेच अफेअरबाबत ऐकत असतो. पण तुम्हाला हे माहित का? बॉलिवूड अभिनेत्री परिणीती चोप्रा हिला सैफ अली खान खूप आवडतो.

परिणीतीने एकदा नाहीतर अनेक वेळा ही गोष्ट सांगितली आहे की, तिला सैफ अली खान खूप आवडतो आणि जर तिला संधी मिळाली तर ती त्याला किडनॅप देखील करू शकते. ‘द कपिल शर्मा’ शोच्या एपिसोडचा एक व्हिडिओ गॉसिप गर्लने यूट्यूबवर शेअर केला आहे. (parineeti chopra once revealed that she wants to kidnap saif ali khan, if she get chance )

एकदा सैफ अली खान त्याच्या एका चित्रपटाच्या शूटिंगसाठी ‘द कपिल शर्मा शो’मध्ये गेला होता. तेव्हा कपिलने सैफला तो व्हिडिओ दाखवला, जेव्हा परिणीती त्याच्या शोमध्ये आली होती. तिने सैफ अली खान प्रति असणारे तिचे प्रेम जाहीर केले होते. ती म्हणाली होती की, जर तिला संधी मिळाली तर ती सैफ अली खानला किडनॅप करणार आहे. यासोबत तिने हे देखील सांगितले की, करीना कपूरला देखील ही गोष्ट माहित आहे. ती म्हणाली की, तिला देखील माहित आहे की, “मला सैफ अली खान किती आवडतो.”

हा व्हिडिओ बघितल्यानांतर जेव्हा कपिल शर्माने सैफला त्याची प्रतिक्रिया विचारली, तेव्हा तो एकदम अवाक झाला होता. त्याला यावर काय बोलावे काळात नव्हते. यावर मस्तीच्या मूडमध्ये कपिल म्हणाला की, “नशीब असावं तर सैफ अली खानसारखं. आधीच करीना बायको म्हणून मिळाली आणि त्यावर परिणीती त्याला किडनॅप करू इच्छिते.”

करण जोहरच्या एका शोमध्ये परिणितीने खुलासा केला होता की, तिला सैफ खूप आवडतो. तिने हे देखील सांगितले होते की, ती सैफच्या कोणत्याही गोष्टीला हो म्हणू शकते. तिने तिच्या क्रशबाबत अनेक गोष्टी सांगितल्या होत्या.

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

हेही नक्की वाचा-
‘या’मुळे कॅटरिना कैफला खूप घाबरते परिणीती चोप्रा, अभिनेत्री स्वत: सांगितले कारण
शाहीन भट्टला पॅपराझींनी म्हटले, ‘मावशी’, प्रतिउत्तर देत अभिनेत्रीनं दिली मजेशीर प्रतिक्रिया

हे देखील वाचा