Thursday, July 18, 2024

शाहीन भट्टला पॅपराझींनी म्हटले, ‘मावशी’, प्रतिउत्तर देत अभिनेत्रीनं दिली मजेशीर प्रतिक्रिया

बाॅलिवूड लाेकप्रिय अभिनेत्री आलीय भट्ट आणि प्रसिद्ध अभिनेता रणबीर कपूर येत्या आठवड्यात त्यांच्या बाळाचे स्वागत करणार आहेत. गुरुवारी(दि.20 ऑक्टोबर)ला आलियाची बहीण शाहीन भट्ट एका दिवाळी पार्टीत सहभागी झाली होती जिथे पॅपराझींनी तिला ‘मावशी’ म्हटले. हा व्हिडिओ साेशल मीडियावर प्रचंड व्हायरल हाेत असुन चाहते या व्हिडिओवर विविध प्रतिक्रिया देत आहे.

व्हिडीओमध्ये दिसत आहे की, पार्टीसाठी शाहीन भट्ट (shaheen bhatt) हिने हिरवे आणि सोनेरी रंगाचे कपडे परिधान केले होते, ज्यात ती खूप सुंदर दिसत होती. या दिवाळी पार्टीला शाहीन एकटीच आली होती.

 

View this post on Instagram

 

A post shared by Manav Manglani (@manav.manglani)

शाहीन फॅशन डिझायनर मनीष मल्होत्राच्या घराबाहेर कारमधून बाहेर पडताना दिसली. ती पार्टीला जात असताना अचानक एका पॅपराझींने हसून तिला ‘मावशी जी’ म्हटले. नंतर तिने पापाराझींना फोटोसाठी पोजही दिली.

आई झाल्यानंतर आलिया थांबवेल काम
नुकत्याच झालेल्या एका मुलाखतीत शाहीनने लोकांच्या कयासांबद्दल सांगितले होते की, “आलिया भट्ट आई झाल्यानंतर  तिचे काम थांबवेल.” माध्यमांशी बोलताना शाहीन म्हणाली की, “मी त्यांच्या आलियासाठी बोलणार नाही , कारण हा तिचा स्वतःचा प्रवास आहे. तिने जे काही केले ताे पूर्णपणे तिचा प्रवास आहे. मला वाटते की, लोकांच्या नजरेत राहून, आपल्या सर्वांना माहित आहे की, आपण कशावर लक्ष द्यावे आणि कशावर नाही.”

 

View this post on Instagram

 

A post shared by Shaheen Bhatt (@shaheenb)

शाहीन व्यतिरिक्त या सेलिब्रेटींनी दिवाळी पार्टीत लावली हजेरी
बाॅलिवूड प्रसिद्ध अभिनेत्री कियारा अडवाणी, सिद्धार्थ मल्होत्रा, विकी कौशल, कॅटरिना कैफ, सुहाना खान, जान्हवी कपूर, खुशी कपूर, काजोल, ऐश्वर्या राय, करिश्मा कपूर, शिल्पा शेट्टी, कार्तिक आर्यन, माधुरी दीक्षित, सारा अली खान, इब्राहिम अली यासारख्या सेलिब्रेटींनी मनीष मल्होत्राच्या दिवाळी पार्टीत हजेरी लावली हाेती.

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
हेही वाचा-
‘परदेस’मध्ये सलमान अन् माधुरीला करायचं होतं काम, पण ऐन मोक्यावर सुभाष घईनं घातला रोडा

‘राम सेतू’ चित्रपट वाचवू शकेल का अक्षय कुमारची डुबती नय्या, ओपनिंग दिवशी जमेल का एवढा गल्ला?

हे देखील वाचा