Saturday, April 19, 2025
Home बॉलीवूड ‘ऍनिमल’ चित्रपट न करण्याच्या परिणीतील होतोय पश्चाताप?; अभिनेत्रीने सोडले मौन

‘ऍनिमल’ चित्रपट न करण्याच्या परिणीतील होतोय पश्चाताप?; अभिनेत्रीने सोडले मौन

अभिनेत्री परिणीती चोप्राने (Parineeti Chopra) नुकतेच ब्लॉकबस्टर चित्रपट ‘ॲनिमल’ मधील मुख्य भूमिकेबद्दल सांगितले, ज्याची भूमिका रश्मिका मंदान्नाने केली आहे. दिग्दर्शक संदीप रेड्डी वंगा यांनी सुरुवातीला ॲक्शन ड्रामामध्ये रणविजयची पत्नी गीतांजली म्हणून परिणीती चोप्राला कास्ट करण्याची योजना आखली. मात्र, वेळापत्रकातील अडचणींमुळे तिने हवव ऑफर नाकारली. आता परिणीतीने याबाबत मौन सोडले आहे. ती एक मोठं वक्तव्यही करताना दिसली.

‘ॲनिमल’ने बॉक्स ऑफिसवर 900 कोटींची कमाई केली. असे असूनही परिणीती चोप्राला तिच्या निर्णयावर कोणताही पश्चाताप नाही. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत परिणीती चोप्राने खुलासा केला की, ‘मला वाटते की देवाने माझ्यासाठी काहीतरी चांगले केले होते. मी तो चित्रपट (ऍनिमल) करत होते, जवळपास सर्वच गोष्टींवर काम केले होते. पण त्या तारखांना मला चमकिला ऑफर झाली.

अभिनेत्री पुढे म्हणाली, ‘मला अनेक गाण्यांची ऑफर आली होती, मी एआर रहमानने संगीतबद्ध केलेली गाणी गात होते. इम्तियाज अली हा माझा ड्रीम डायरेक्टर आहे. मला आणखी बरेच काही करण्याची ऑफर आली होती, म्हणून मी चमकीला निवडले.

परिणीती पुढे म्हणाली, ‘मला वाटते की मला याचा पश्चाताप होत नाही, मी आनंदी आहे.’ ‘चमकिला’मध्ये परिणीती चोप्राने दिवंगत पंजाबी गायक अमर सिंह चमकीला यांच्या पत्नी अमरजोतची भूमिका साकारली होती.

इम्तियाज अली दिग्दर्शित या चित्रपटात दिलजीत दोसांझ मुख्य भूमिकेत होता. हे नेटफ्लिक्सवर रिलीज करण्यात आले होते आणि परिणीती चोप्राच्या अभिनयाची समीक्षकांनी प्रशंसा केली होती. तिचा पती राघव चढ्ढा यांनीही खुलासा केला की, ‘जेव्हा परिणीती भारतात परतली तेव्हा ती शूटिंगसाठी थेट पंजाबला आली होती. आम्ही भेटत राहिलो आणि काळानुसार नाते अधिक घट्ट होत गेले. पूर्वी आम्ही लोकांच्या नजरेपासून दूर गुपचूप भेटायचो.

दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा 

हेही वाचा

अनन्यासाठी भावूक झाले वडील चंकी पांडे; म्हणाले, ‘हे सगळं जिथून सुरू झालं…’
कडेकोट सुरक्षा व्यवस्था, हातात शस्त्रे घेऊन बॉडीगार्ड्स, अशा प्रकारे मुंबईत पोहचला सलमान खान

हे देखील वाचा