प्रदर्शनापूर्वीच रेकार्ड ब्रेक करणाऱ्या पठाण चित्रपटाने बक्सऑफिसवर धमाका केला आहे. प्रदर्शनाच्या दोनच दिवसात चित्रपटाने 100 कोटींपेक्षा जास्त गल्ला जमवला आहे. एकीकडे वाद आणि दुसरीकडे चाहत्यांप्रती पठाणसाठी प्रमे पाहुन अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला आहे. ट्रोलर्सला बॉलिवूडने पठाण चित्रपटाद्वारे चांगलच उत्तर दिलं आहे. पठाण चित्रपट पाहण्यासाठी चाहत्यांची हुज्जत उडाली असून थिएटरमध्ये चित्रपट पाहायला आलेल्या चाहत्यांमध्ये जोरदार भांडण पाहायला मिळाली. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत.
शाहरुख खान (Shahrukh khan) स्टारर पठाण (Pathan) चित्रपट प्रदर्शित झाल्यापासू प्रेक्षकांमध्य चित्रपट पाहाण्यासाठी एक वेगळीच उत्सुकता पाहायाल मीळत आहे. तब्बल 4 वर्षानंतर शाहरुख मोठ्या पडद्यावर पाहायला मिळत असल्याने चाहत्यांचा आनंद गगनात मावेनासा झाला आहे त्यामुळे प्रत्येकानेच हा चित्रपट मोठ्या पडद्यावर पाहाण्यासाठी थिएटरमध्ये जोरदार गर्दी पाहायला मिळत आहे. अशातच चित्रपट पाहाण्यासाठी एवढी गर्दी वाढली की, चाहत्यांमध्ये जोरदार हाणामारी झाली. ही घटना उत्तर प्रदेशच्या अमरोहामध्ये घडली आहे. सिनेप्लेक्स या मॉलमधले प्रेक्षक एकमेकांना भिडले.
उत्तर प्रदेशमधील अमरोहाच्या सिनेमा हॉलमध्ये गुरुवार (19 जानेवारी) शेवटचा शो पाहाण्यासाठी तुफान गर्दी झाली होती. त्यामुळे सुरक्षेचे बंधन पाळले गेले नाही, तिकिटं हातामध्ये घेऊन सिनेमा पाहाण्यासाठी गेली. मात्र, नंतर दोन गटांमध्ये कोल्ड ड्रींकवरुन वाद निर्माण झाला, वाद एवढा वाढला की, लाठ्या काठ्यांनी माराहन झाली. या घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे. थिएटरमध्ये ही घटना घडल्याने पोलिसांनी या प्रकरणात दोघांनाही अटक केले. सिनेप्लेक्सच्या कर्मचाऱ्यांनी चारजणांना अटक केली गेली आहे असा दावा केला आहे.
माधौ सिनेप्लेक्स थिएटरचे मॅनेजर अब्दु हाई यांनी सांगितले की, “गुरुवार रात्री थिएटरमध्ये कोल्ड ड्रिंकच्या बाटल्या संपल्या होत्या. एकच कोल्डड्रिंक होती. यावरून दोन गटांमध्या मारामारी झाली. त्यानंतर बाचाबाची, शिवीगाळ आणि नंतर हाणामारी झाली. लाठ्या काठ्या घेऊन दोन गट एकमेकांना भिडले.” असेही म्हटले जात आहे या भांडणामध्ये बॉयकॉट आणि दीपिकाच्या भगव्या बिकिनचाही वाद निर्माण झाला होता, त्यामुळे चित्रपट पुढे चालेल का नाही अशाही चार्चाना उधान आलं आहे.
दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
दैनिक बोंबाबोंबचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्त्वाच्या बातम्या-
हंसती हंसती रहे तु हस्ती रहे, हया की लाली खिलती रहे…!
गोल्डन लाईट गोल्डन सिटी! सोनाली कुलकर्णीचा दिखुलास अंदाज