Friday, April 19, 2024

कुठे हाेतेय मारामारी तर कुठे तिकिटासाठी 10 हजार देण्याची तयारी, पाहा ‘पठाण’ ने कसा घातलाय धुमाकूळ

बाॅलिवूड अभिनेता शाहरुख खानचा ‘पठाण‘ चित्रपट पहिल्या दिवसापासून बॉक्स ऑफिसवर आपली दमदार कामगिरी दाखवत आहे. चार वर्षांनंतर शाहरुखने मोठ्या पडद्यावर पुनरागमन केल्याबद्दल चाहते खूप आनंदी आहेत आणि कोणत्याही किंमतीत हा चित्रपट पाहण्यास तयार आहेत. त्याचसाेबत चाहत्यांमध्ये या चित्रपटाची इतकी क्रेझ आहे की, ते 10 हजार रुपये देऊनही हा चित्रपट पाहणार असल्याची चर्चा आहे.

‘पठाण’च्या रिलीजचा आज तिसरा दिवस असून दोन दिवसांत या चित्रपटाने 100 कोटींहून अधिकचा व्यवसाय केला आहे. या चित्रपटाची क्रेझ चाहत्यांमध्ये माेठ्या प्रमाणात पाहायला मिळत आहेत. या चित्रपटाने जगभरात 200 कोटींचा टप्पा ओलांडला आहे. अशा परिस्थितीत चित्रपटाचे सर्व शो हाऊसफुल्ल होत असल्याने चाहत्यांना तिकीट मिळणे अवघड झाले आहे. अशात आता सोशल मीडियावर एक व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे, ज्यामध्ये एक चाहता चित्रपट पाहण्यासाठी 10,000 रुपये देण्यासही तयार आहे.

सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या या व्हिडिओमध्ये शाहरुख खानचे चाहते चित्रपटाचे तिकीट न मिळाल्याने निराश झाल्याचे दिसत आहे. यासोबतच या चित्रपटाला विरोध करण्यावरही त्यांचा आक्षेप आहे. यानंतर एका चाहत्याने मीडियाला अनोखी विनंती केली की, ‘आम्हाला तिकीट मिळत नाहीये. तुम्ही लोक वेगवेगळ्या माध्यमातील आहात, तिकीट मिळाली तर द्या. मी दहा हजार द्यायलाही तयार आहे. मला तिकीट द्या, मी जातो.’ चित्रपटासाठी एवढे पैसे देणार का असा प्रश्न त्याला विचारल्यावर तो म्हणाला, ‘हो जाईन.’

‘पठाण’मध्ये शाहरुख खान व्यतिरिक्त दीपिका पदुकोण आणि जॉन अब्राहम मुख्य भूमिकेत आहेत. सिद्धार्थ आनंद दिग्दर्शित ‘पठाण’ला एकीकडे विरोध होत आहे, तर दुसरीकडे चाहत्यांची क्रेझ पाहायला मिळत आहे. या चित्रपटाने पहिल्या दिवसापासूनच बॉक्स ऑफिसवर दमदार कमाई करत अनेक विक्रम मोडले आहेत.(bollywood actor shah rukh khan crazy fan willing to pay 10 thousand for movie ticket after houseful shows see video)

दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
दु:खद! एनटीआर आणि नागेश्वर राव सारख्या कलाकारांसोबत काम करणाऱ्या ज्येष्ठ अभिनेत्रीचे निधन
क्रिकेटनंतर आता मनोरंजनाच्याही मैदानावर उतरतोय धोनी, चित्रपटाचे मोशन पोस्टर आऊट

हे देखील वाचा