Wednesday, July 3, 2024

Video: ‘तितली’ गाण्यावर अंकिता लोखंडेचा भन्नाट डान्स; २ दिवसांत मिळाले २ लाखांपेक्षाही अधिक लाईक्स

‘पवित्र रिश्ता’ मालिकेतून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री अंकिता लोखंडे ही सोशल मीडियावर खूपच सक्रिय असते. सोशल मीडियाद्वारे ती तिच्या आयुष्यातील चांगले- वाईट अनुभव चाहत्यांसोबत शेअर करत असते. ती एका अभिनेत्रीसोबतच एक उत्तम डान्सरदेखील आहे. तिने नुकताच एका गाण्यावर भन्नाट डान्स केला आहे. तो व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. तसेच एकता कपूर हिने अंकिता लोखंडे हिच्या चाहत्यांना एक चांगली बातमी सांगितली आहे. ती म्हणजे एकता कपूर लवकरच ‘पवित्रा रिश्ता सीझन 2’ प्रेक्षकांसमोर घेऊन येणार आहे.

अंकिताने तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवर एक डान्स व्हिडिओ शेअर केला आहे. ज्यामध्ये ती ‘चेन्नई एक्स्प्रेस’ या सिनेमातील ‘तितली’ या गाण्यावर डान्स करत आहे.

अंकिताच्या या व्हिडिओला तिचे चाहते खूपच लाईक्स आणि प्रेम देत आहेत. तिच्या या व्हिडिओला आतापर्यंत 1 लाखांपेक्षाही जास्त प्रेक्षकांनी बघितले आहे. सोबतच या व्हिडिओला 2 लाखांपेक्षाही अधिक लाईक्स मिळाले आहेत. पांढऱ्या रंगाच्या अनारकली ड्रेसमध्ये अंकिता तिच्या ‘अर्चना’ या पात्रासारखी दिसत आहे. तिचे अनेक चाहते तिला या ड्रेसमध्ये बघून खूपच आनंदी झाले आहेत.

अंकिताच्या चाहत्यांसाठी निर्माता एकता कपूर एक आनंदाची बातमी घेऊन आली आहे. तिने सांगितले आहे की, लवकरच डिजिटल प्लॅटफॉर्मवर ती ‘पवित्रा रिश्ता सीझन 2’ घेऊन येणार आहे. एका मुलाखतीमध्ये या मालिकेचे दिग्दर्शक ‘कुशल झवेरी’ यांनी सांगितले की, ‘पवित्रा रिश्ता सीझन 2 मध्ये अंकिता लोखंडे हिला मुख्य भूमिकेसाठी साईन केले आहे. या शोचा प्रीमियर ओटीटी प्लॅटफॉर्मवर दाखवला जाईल.’

दिग्दर्शक कुशल झवेरी यांनी पुढे सांगितले की, ‘माझ्या व्यतिरिक्त अनेक दिग्दर्शक या‌ मालिकेसोबत जोडले होते. जर मला संधी मिळाली, तर मला पुन्हा त्या प्रोजेक्टचा भाग बनायला आवडेल.’ तसेच ते अंकिताचे देखील कौतुक करतात. ते म्हणतात की, ‘अंकिता एक कमालीची अभिनेत्री आहे. ती जे पण करते ते 100% करते. त्यामुळे या शोमध्ये तिला पुन्हा बघून तिचे चाहते नक्कीच आनंदी होतील.’

या मालिकेच्या पहिल्या भागाला प्रेक्षकांचं भरभरून प्रेम मिळालं होतं. या सीझनमध्ये अंकिता लोखंडे आणि सुशांत सिंग राजपूत हे दोघे ही मुख्य भूमिकेत होते. पवित्रा रिश्ता या मालिकेमधून ते दोघे एकमेकांच्या जवळ आले. परंतु त्यांनी त्यांचं प्रेम कधी जगापासून लपवून नाही ठेवलं. सुशांतच्या मृत्यूनंतरही अंकिता सोशल मीडियावर सुशांत सिंग सोबतच्या अनेक आठवणी प्रेक्षकांसोबत शेअर करत असते.

हेही वाचा-

‘दिलबर गर्ल’ म्हणून ओळखली जाणारी नोरा एकेकाळी लोकल मार्केटमध्ये विकायची कपडे; आता बनलीय ‘दबंग खान’ची हिरोईन

‘छम्मा छम्मा’ गाण्यावर क्रिकेटपटू युझवेंद्र चहलच्या बायकोने धरला ठेका, व्हिडिओ होतोय भन्नाट व्हायरल

शिल्पाजी, तुमची ऊंची किती हो..? नेहमीच्या प्रश्नाचं अभिनेत्रीने व्हिडिओ शेअर करत दिलं उत्तर; पाहा

हे देखील वाचा