‘बाहुबली’ चित्रपटाच्या ‘मनोहरी’ गाण्यामुळे प्रसिद्ध झालेली अभिनेत्री ‘नोरा फतेही’ बहुतेकदा तिच्या डान्स व्हिडिओमुळे चर्चेत राहते. ‘दिलबर गर्ल’ म्हणून प्रसिद्ध असलेल्या नोरा फतेहीने नुकताच आपला 29 वा वाढदिवस साजरा केला. तिचा जन्म 6 फेब्रुवारी 1992 रोजी कॅनडामध्ये झाला होता. नोरा एक उत्तम डान्सर आहे आणि बर्याचदा ती तिचे डान्स व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करत असते. प्रेक्षकही नोराच्या डान्सचे चाहते आहेत आणि ते तिच्या प्रत्येक व्हिडिओला भरपूर प्रतिसाद देत असतात.
तिच्या डान्समुळे बर्याचदा चर्चेत असणारी नोरा एकदा बँकॉकच्या स्थानिक बाजारात कपड्यांची विक्री करताना दिसली होती. तिचा हा व्हिडिओ बराच व्हायरल झाला होता. होय, व्हिडिओमध्ये नोरा जमिनीवर बसून लोकांना कपडे दाखवत होती. यावेळी तिने पीच कलरचा टी-शर्ट व शॉर्ट्स परिधान केले होते. व्हिडिओमध्ये तिच्याभोवती कपड्यांचा ढीग पडलेला दिसत आहे.
इतकेच नव्हे तर नोरा ग्राहकांना कपडे दाखवून वाटाघाटी देखील करत होती. नोराच्या चाहत्यांना तिचा हा व्हिडिओ खूप आवडला. व्हिडिओ पाहताना काही लोक असेही म्हणत होते की, ‘नोराला हे काम का करावे लागले असेल?’
नोराने ‘रोअर: टाइगर ऑफ द सुंदरबन’ या चित्रपटाद्वारे बॉलिवूड फिल्म इंडस्ट्रीमध्ये पदार्पण केले होते. यानंतर तिला टॉलिवूडमध्येही बर्याच संधी मिळाल्या. नोरा ‘बिगबॉस 9’ या शो मध्ये देखील दिसली होती. सलमान खानच्या या रियॅलिटी शोमध्ये दिसल्यानंतर नोरा खूप प्रसिद्ध झाली होती.
नोरा फतेही तिच्या डान्सच्या स्टेप्सच नव्हे, तर तिच्या सौंदर्य आणि तंदुरुस्त शरीराने प्रेक्षकांना मोहून टाकते. ‘बाहुबली द बिगनिंग’, तेलगू फिल्म ‘टेंपर’ आणि जॉन अब्राहमची ‘सत्यमेव जयते’, सलमान खानचा चित्रपट ‘भारत’ यांसारख्या चित्रपटामध्ये केलेल्या आयटम साँग्समुळे नोराने प्रेक्षकांची मने जिंकली आहेत.
हेही वाचा-
सेक्सी डान्स करत होती नोरा फतेही, किचनमधून आईने पाहताच थेट चप्पल फेकून मारली; पाहा व्हिडिओ