भोजपुरी चित्रपटसृष्टीत अनेक कलाकार आहेत, ज्यांनी त्यांच्या अभिनयाने प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवले आहे. यातील एक अभिनेता आणि गायक म्हणजे पवन सिंग. भोजपुरी चित्रपटसृष्टीचा त्याला ‘पावर स्टार’ म्हणून ओळखले जाते. भोजपुरीमध्ये त्याने अनेक गाण्यांमध्ये परफार्मन्स केला आहे. त्यामुळे त्याची लोकप्रियता सर्वत्र पसरली आहे. तो त्याच्या व्यावसायिक आयुष्यासोबत वैयक्तिक आयुष्यामुळे देखील खूप चर्चेत राहिला आहे. अशातच बुधवारी (५ जानेवारी) पवनसिंग त्याचा वाढदिवस साजरा करत आहे. या निमित्त जाणून घेऊया त्याच्या वैयक्तिक आयुष्यातील काही गोष्टी.
पवन सिंगचा जन्म बिहारमधील आरा गावात ५ जानेवारी १९८६ मध्ये झाला. लहानपणापासूनच त्याला गायनाची खूप आवड होती. मोठे झाल्यावर त्याने त्याची आवड जोपासत गायनामध्ये करिअर केले. त्याची सर्वत्र ओळख निर्माण झाली. तो त्याच्या वैयक्तीक आयुष्यामुळे देखील खूप चर्चेत राहिला आहे. (pawan singh celebrate his birthday lets know about his love life)
पवन सिंग आणि अक्षरा सिंग अनेक दिवसापासून लिव्हइन रिलेशनमध्ये राहिले आहेत. त्यांचे नाते सगळ्यांना माहित झाले होते. परंतु एक दिवशी अचानक तिने पवन सिंगवर गंभीर आरोप लावला. त्यानंतर त्यांचे ब्रेकअप झाले आणि त्यांचे रस्ते वेगळे झाले. याचे कारण म्हणजे पवन सिंगने गुपचूप केलेले लग्न.
पवनचे पहिले लग्न २०१४ मध्ये नीलम सिंगसोबत झाले होते. त्यानंतर त्यांच्या वैयक्तिक वादामुळे पवन घरी नसताना तिने आत्महत्या केली होती. त्यानंतर पवन खूप एकटा पडला होता. पवन सिंग आणि अक्षरा सिंग त्यानंतर एकत्र आले. त्यांनी दोघांनी मिळून खूप चित्रपट केले. या दोघांची जोडी चाहत्यांना खूप आवडत होती. त्यांची पडद्यावरील जोडी एकमेकांबरोबर खऱ्या आयुष्यातही एकत्र राहू लागली.
पवन सिंग आणि अक्षरा सिंग एकत्र असताना अचानक पवन सिंगने लग्न केले आहे, अशी बातमी आली आली. महत्वाचं म्हणजे ते लग्न अक्षराबरोबर नाही, तर ज्योती सिंबरोबर केले होते आणि याच कारणामुळे अक्षरा आणि पवन वेगळे झाले.
पवनने ज्योतीसोबत ५ मार्च २०१८ मध्ये लग्न केले. त्यांचे फोटो सोशाल मीडियावर टाकल्यानंतर ही बातमी सगळ्यांना समजली होती. परंतु त्याची एक्स गर्लफ्रेंड अक्षरा सिंगचे असे म्हणणे होते की, याबाबत तिला काहीच माहिती नव्हती. त्यानंतर तिने असा आरोप लावला होता की, त्याने तिला जीवे मारण्याची धमकी दिली होती.
तसेच पवनसिंग तिचे करिअर बरबाद करण्याचा प्रयत्न करत होता. तसेच तिच्या कुटुंबाला देखील त्रास देत होता. अक्षराने हे देखील सांगितले की, जेव्हा ते रिलेशनमध्ये होते तेव्हा तो तिच्याशी चुकीचा व्यवहार करत असायचा. त्याने तिने धोका देऊन दुसऱ्या मुलीसोबत लग्न केले. तरी लग्न झाल्यावर देखील त्याला अक्षरासोबत रिलेशनमध्ये राहायचे होते.
हेही वाचा :
वयाच्या १६ व्या वर्षी केली मॉडेलिंगमधून सुरुवात, दीपिका पदुकोण आज आहे निर्मिती क्षेत्रात कार्यरत
अनेक चित्रपट फ्लॉप होऊनही उदय चोप्रा एवढ्या संपत्तीचा मालक, हे आहे त्याच्या कमाईचे साधन