टेलिव्हिजनवरील ‘इंडियन आयडल’च्या इतिहासात १२ वे पर्व हे भव्य दिव्य झाले. पहिल्यांदाच हा शो तब्बल १० महिने चालला. याहून अधिक दिव्य गोष्ट म्हणजे या शोचे ग्रँड फिनाले १२ तास चालले आहे. इंडियन आयडलच्या इतिहासात ही गोष्ट आधी कधीच घडलेली नाही. रविवारी (१५ ऑगस्ट) या शोचा ग्रँड फिनाले झाला. सगळ्यांचे डोळे या शोच्या निकालाकडे लागले होते. अशातच रात्री १२ वाजता या शोच्या विजेत्या स्पर्धकाचे नाव घोषित झाले आहे. इंडियन आयडल १२ या पर्वाची ट्रॉफी पवनदीप राजन याच्या नावावर झाली आहे.
यावेळी मंचावर सोनू कक्कर, हिमेश रेशमिया आणि उपस्थित होते. सगळ्या परीक्षकांच्या हस्ते पवनदीपला इंडियन आयडल १२ ची ट्रॉफी आणि २५ लाख रुपयांचा चेक देण्यात आला. तसेच त्याला एक स्विफ्ट गाडी देखील मिळाली आहे. यावेळी पवनदीप खूपच खुश दिसत होता. तसेच त्याच्या सगळ्या चाहत्यांना खूप आनंद झाला आहे. सर्वांनी स्टेजवर येऊन त्याला उचलून घेतले. हा आनंद पाहून पवनदीपच्या आईला अश्रू अनावर झाले.(Pawandeep rajan win the trophy indian ideal 12)
YESSS HE DESERVE THIS ❤️????????
CONGRATULATIONS PAWANDEEP RAJAN … YOU MADE DEVBHOOMI UTTARAKHAND PROUD ❤️✨#IndianIdol #PawandeepRajan #IndianIdolGreatestFinaleEver pic.twitter.com/j6aimzLQMm— Vikas Rawat (@Vickyrwt3) August 15, 2021
यामध्ये सहाव्या क्रमांकावर शन्मुखप्रिया, पाचव्या क्रमांकावर निहाल, चौथ्या क्रमांकावर दानिश, तिसऱ्या क्रमांकावर सायली कांबळे, तर दुसऱ्या क्रमांकावर अरुणिता कांजिलाल राहिली.
पवनदीप राजन हा इंडियन आयडलमधील एक लोकप्रिय स्पर्धक होता. त्याने त्याच्या आवाजाची जादू संपूर्ण देशाला दाखवून दिलीच आहे. शोमध्ये आलेला कोणताही पाहुणा पवनदीपचे कौतुक केल्याशिवाय राहत नव्हता. अशातच या शोचा तो विजेता झाला आहे. त्यामुळे त्याच्या चाहत्या वर्गामध्ये कमालीचे उत्साहाचे वातावरण पाहायला मिळत आहे. या शोच्या ग्रँड फिनालेला पवनदीपसह अरुणिता कांजीलाल, शन्मुखप्रिया, सायली कांबळे, निहाल आणि दानिश खान हे ६ स्पर्धक होते. प्रत्येकानेच या शोमध्ये त्यांचे शर्थीचे प्रयत्न केले, पण विजेता नेहमी कोणतरी एकच असतो. यावेळी सगळ्यांमध्ये आनंदाचे वातावरण दिसत होते.
या ग्रँड फिनालेमध्ये अनेक कलाकारांनी हजेरी लावली होती. तसेच अनेक संगीतकार, गायक यांनी देखील गाणी गायली आहेत.
दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…
हेही नक्की वाचा-
-‘इंडियन आयडल १२’च्या निकालात मोठा ट्विस्ट, घोषित होणार दोन विजेते?
-टीव्ही इतिहासात पहिल्यांदाच १२ तासांचा फिनाले प्रसारित, ‘इंडियन आयडल’च्या ६ शिलेदारांमध्ये टक्कर